BBC Documentary : माहितीपट पाहताच माझं रक्त उसळलं, ब्रिटिश खासदारांनीही व्यक्त केला संताप

BBC Documentary : माहितीपट पाहताच माझं रक्त उसळलं, ब्रिटिश खासदारांनीही व्यक्त केला संताप

Bob Blackman on BBC Documentary | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बीबीसीने (British Broadcasting Company) बनवलेल्या माहितीपटाचा वाद अद्यापही शमत नाहीय. बीबीसीच्या माहितीपटावर ( BBC Documentary) देशभरातून टीका झाल्यानंतर आता ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन (British MP Bob Blackman) यांनीही या माहितीपटाविरोधात संताप व्यक्त केला आहे. हा माहितीपट पाहताच माझं रक्त उसळलं असं ते म्हणाले. हा माहितीपट म्हणजे नरेंद्र मोदींचा अपप्रचार असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन म्हणाले की, या माहितीपटाचं प्रदर्शन रोखलं पाहिजे होतं. २००२ सालच्या दंगलीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची तपासणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या आरोपांबाबत सर्वोच्च न्यायालयाला एकही पुरावा आढळला नाही, असंही बॉब यांनी पुढे स्पष्ट केलं. भारत आणि युकेमधील संबंध बिघडवण्याचा बीबीसी अजेंडा राबवत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व मुद्दे थट्टा करणारे आहेत. मी या माहितीपटाचे दोन्ही भाग पाहिले असून त्यामुळे माझे रक्त उसळले, असंही ते पुढे म्हणाले.


ब्रिटीश खासदार ब्लॅकमन हे सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत आणि हॅरो ईस्टचे खासदार आहेत. ते म्हणाले की, 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी दंगलीच्या वेळी शांततेचे आवाहन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता. ब्रिटीश सरकार भारताला एक मजबूत मित्र, मजबूत सहयोगी मानते आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अडथळे आणला जात आहे.

बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. करचुकवेगिरी केल्याप्रकरणी आयकर विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. याविषयी बोलताना ब्लॅकमन म्हणाले की, आयकर विभागाने त्यांना कराबाबतेच नियम आणि कायद्याचं पालन करण्याचे आवाहन केले आहे.

First Published on: February 17, 2023 12:00 PM
Exit mobile version