Boris johnson: बोरिस जॉन्सन स्वागतावर म्हणाले, मला सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन…

Boris johnson: बोरिस जॉन्सन स्वागतावर म्हणाले, मला सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन…

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने झालेल्या स्वागताच्या निमित्ताने दिलखुलास पद्धतीने या स्वागताचे कौतुक केले. गुजरात येथे झालेले स्वागत म्हणजे मला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्यासारखे वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय खास मित्र असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही देशांमध्ये नातं अतिशय मजबूत असल्याचे म्हटले आहे.

सचिन, अमिताभ असल्यासारख वाटलं…

जॉन्सन यांनी दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेची माहिती ही पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना गुजरात दौऱ्यात झालेल्या स्वागताने भारावून गेल्याचेही म्हटले. या दौऱ्यात मी सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन असल्यारखे आदरातिथ्य झाल्याचे त्यांनी सांगितले. अहमदाबाद येथे माझे पोस्टर्स चारही दिशेला लागले होते, हे सगळ अतिशय़ भारीच होते.

जॉन्सनने या पत्रकार परिषदेत म्हटले की, या आव्हानाच्या काळात भारत आणि ब्रिटन अतिशय जवळ आले आहेत. त्यांनी दोन्ही देशात सुरक्षेच्या मुद्द्यावर करार करण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच काही सुरक्षेशी संबंधित करारही झाले. फायटर जेट टेक्नॉलॉजी ते समुद्रातील टेक्नॉलॉजीही भारतासोबत शेअर करण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. जॉन्सन यांनी सांगितले की, कोरोनापासून संरक्षणासाठी मी भारतातील कोरोनाविरोधी लस घेतली आहे. भारताचे या लसीकरणाबाबत खूप धन्यवाद मानतो.

यूक्रेन युद्धाचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेन युद्धाचा उल्लेख करत हे युद्ध तत्काळ रोखण्याच्या मुद्द्यावर पुन्हा भर दिला. या समस्येवर उपाययोजनेसाठी राजकीय पद्धतीच्या उपायावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही जॉन्सन यांच्यासोबकत सर्व देशांच्या क्षेत्रीय अखंडतेवर चर्चा केली. युक्रेन युद्धावर भारताना रूसवर बोलताना भारताने अतिशय सावध अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.


 

First Published on: April 22, 2022 2:47 PM
Exit mobile version