ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! विषाणूवर चीनी वॅक्सीनही ठरतेय निष्फळ

ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! विषाणूवर चीनी वॅक्सीनही ठरतेय निष्फळ

ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! विषाणूवर चीनी वॅक्सीनही ठरतेय निष्फळ

ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. यात रविवारी कोरोना संसर्गामुळे ब्राझीलमधील तब्बल १८०३ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे ब्राझीलमध्ये कोरोना स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत आहे. देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ब्राझील सरकारने चीनकडून मोठ्याप्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक वॅक्सीन खरेदी केले, मात्र हे चीनी वॅक्सीन निष्फळ ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्राझीलमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या स्ट्रेन p1 वर ५० टक्केच रुग्णावर ही चीनी लस प्रभावी ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ब्राझील कोरोना महामारीचे मुख्य हॉटस्पॉट ठरत आहे. एकट्या रविवारी ब्राझीलमध्ये तब्बल ३७००० हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले. जगभरातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत भारतानंतर ब्राझीलचा नंबर लागतो. एकीकडे कोरोना लसीकरणावरून सुरु असलेला गोंधळ आणि दुसरीकडे पी१ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे ब्राझीलमध्ये कोरोना पुन्हा महामारीचे रुप धारण करत आहे.

साओ पावलोमधील बुटांटन बायोमेडिकल इंस्टिट्यूडच्या मते, चीनची साइनोवॅक ही वॅक्सीन पी १ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविरोधात फक्त ५०.७ टक्केच प्रभावी ठरली आहे. याच इंस्टिट्यूडच्या माध्यामातून ब्राझीलमध्ये सध्या कोरोना वॅक्सीन तयार केली जात आहे. चीनविरोधी भूमिका घेणारे ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांनी सुरुवातीला सांगितले होते की, चीनकडून वॅक्सीन खरेदी करणार नाही, परंतु पुरवठा न मिळाल्याने ब्राझीलच्या राष्ट्रपतींना निर्णय बदलावा लागला.

यावर बुटांटन बायोमेडिकल इंस्टिट्यूडने स्पष्ट केले की, पहिल्या लसीच्या डोस घेतल्यानंतर दुसरा डोस दोन आठवड्यांनंतर घेतला तर लस ६२.३ टक्के प्रभावी ठरते. त्यामुळे चीन वॅक्सीन ८३.७ टक्के ते १०० टक्के प्रभावी ठरत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णाला कोणत्याही उपचाराविना पुन्हा संक्रमिक होण्यापासून ही लस रोखत आहे. यासाठी ब्राझीलमधील १२,४०० स्वयंसेवकांचे परीक्षण करण्यात आले.


 

First Published on: April 12, 2021 10:44 AM
Exit mobile version