Live Update: गोव्यात २४ तासांत १६४ नव्या रुग्णांची वाढ, ४ जणांचा मृत्यू

Live Update: गोव्यात २४ तासांत १६४ नव्या रुग्णांची वाढ, ४ जणांचा मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

गोव्यात २४ तासांत १६४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ४ जणांचा मृत्यू, तर २०२ कोरोनामुक्त झाले आहे. सध्या गोव्यात २ हजार ८७ सक्रीय रुग्ण आहेत.
हरयाणा सरकारने १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला. पण लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना शुभेच्छा दिल्या.
#Live विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद #Live विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, July 4, 2021
 
जम्मू काश्मीरच्या १३ जिल्ह्यांमध्ये विकेंड लॉकडाऊन नसणार फक्त नाईट कर्फ्यू असणार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत, अशी घोषणा जम्मू-काश्मीरच्या सरकारने केली आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मविआ सरकारची महत्त्वपूर्ण बैठक, या बैठकीत अधिवेशनात मांडले जाणारे मुद्दे आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा होणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महादेव जानकरांचे मुंबईत चक्काजाम आंदोलन, जानकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात, अनेक आंदोलक उतरले रस्त्यावर
अधिवेशनाआधी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक, आज संध्याकाळी ७ वाजता पार पडेल महत्त्वपूर्ण बैठक, अधिवेशनाआधी फडणवीसांची पत्रकार परिषद होईल .
कोरोना काळात भारताने चांगलं काम केलंय कोरोनाचा विषाणू शरीरात गेला, भीती डोक्यात गेली- देवेंद्र फडणवीस
जमावबंदी झुगारत सोलापुरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल, सोलापूरातील अनेक लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी, मराठा समाजातील बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश, मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजी, रणसिंह निंबाळकर, राम सातपुते आंदोलनाच्या ठिकाणी दाखल, आमची माणसं सोडल्याशिवाय आम्ही जागेवरून हलणार नाही असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. सोलापूरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा निघणार यावर नरेंद्र पाटील ठाम, नाकाबंदीदरम्यान पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
रत्नागिरीत शिवसेनेला मोठा धक्का, राजापूरच्या शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश. ५० ते ७० शिवसैनिकांचा भाजपा प्रवेश, रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने सेनेला फटका, पहि्ल्या टप्प्यातील प्रवेशात ५० ते ७० जणांचा प्रवेश तर दुसऱ्या टप्प्यात आणखी काही शिवसेना कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता
पालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळणार नव्या करकरीत गाड्या, ६० लाखांचा खर्च वाढणार, येत्या तीन महिन्यात पालिकेला मिळणार नव्या गाड्या
भेटीबाबत अफवा पसरवण्यात आल्या, अशी कोणतीही भेट झालेली नाही, अशा अफवांनी मविआ सरकारला धोका नाही, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शेलारांना भेटलो होतो, माझ्या बोलण्यांत, लिहिण्यातं त्रास झाल्याने अफवा, जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे मविआ सरकार मजबूत होऊल
फ्रान्समध्ये राफेल खरेदी प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी, करारावेळी भारतीय मध्यस्थाला लाच दिल्याचा आरोप, दसाँ एव्हिएशनने मात्र आरोप फेटाळले. स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर चौकशी सुरु
दीड वर्षापूर्वी स्वप्नील एमपीएससी परीक्षा उतीर्ण झाला. उतीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या, २९ जूनला पुण्यातील फुरसुंगी येथे गळफास घेऊन आत्महत्या,
रस्ता रुंदीकरणाच्या आड येणार बंगल्यांवर पालिका कारवाई करणार आहे. यात बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्याचाही समावेश आहे. २०१७ मध्ये पालिकेने यासंदर्भात नोटीस जाहीर केली होती. मात्र नोटीस देऊन अद्याप कारवाई का झाली नाही असे सवाल स्थानिक नगरसेवकांनी केले असून कारावाई न झाल्यास आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
नाशिकमधील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नका असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.
सोलापुरात  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक ते चार पुतळा परिसरापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
First Published on: July 4, 2021 8:32 PM
Exit mobile version