बाळाचे स्तनपान घरात करा

बाळाचे स्तनपान घरात करा

प्रातिनिधिक फोटो

लहान मुलांना स्तनापान करण्यावरून होत असलेल्या जनजागृती होत असतानाच दुसरीकडे अशा महिलांवर बंदी येत असल्याचे चित्र आहे. कोलकाता येथील एका मॉलमध्ये आपल्या बाळाला स्तनपान करत असलेल्या महिलेला थांबवण्यात आले. याचबरोबर बाळाचे स्तनापान करायचे असेल तर घरी करा असा सल्ला मॉलने दिला आहे. ही घटना उघडकीस आल्या नंतर येथील लोकांनी त्याचा विरोध केला तसेच मॉलच्या कर्मचाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. कोलकाताच्या साउथ सिटी मॉल येथे ही घटना घडली. यामहिलेनी मॉलच्या फिडबॅक सेक्सनमध्ये जाऊन या घटनेबद्दल तक्रार केली होती.

काय आहे प्रकरण

अभिलाशा मंगळवारी या मॉलमध्ये आपल्या बाळासह आली होती. या मॉलमध्ये स्तनपान करण्यासाठी जागा नसल्याचे तिने सांगितले. मॉलमधील कर्मचाऱ्यांना या बद्दल विचारले असता त्यांनी शौचालयात जाण्याचा पर्याय सुचवला होता. मॉलमध्ये स्तनपान करण्यासाठी जागा नसल्यामुळे या महिलेनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. मॉलमध्ये स्तनपानासाठी जागानसल्याचे हास्यास्पद असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच बाळाला स्तनपान घारातूनच करुन आणाण्याचा सल्ला देण्यात आला. महिलेने या बद्दल मॉलच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर ही तक्रार केली. यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. महिनलेने मॉलच्या फिडबॅक (प्रतिक्रिया) पर्यायावर जाऊन ही तक्रार केल्यामुळे मॉलने हा पर्याय काढून टाकला आहे.

First Published on: November 29, 2018 11:06 AM
Exit mobile version