लग्न घरात आनंदावर विरजन

लग्न घरात आनंदावर विरजन

आता ५० नाहीतर केवळ २५ जणांच्या उपस्थित उरकावं लागणार लग्न; जाणून घ्या नवे नियम

ओडीशामधील लग्न घरामध्ये दुख:द घटना घडली आहे. लग्नघरात पाठवणीच्या कार्यक्रमामध्ये नवरीचाच मृत्यू झाला. ही घटना ओडीशामधील सोनापूरमध्ये घडली आहे. पाठवणी होत असताना नवरी इतकी रडली की, तिला हृद्य विकाराचा झटका आला. यामुळे लग्नघरात गोंधळ झाला. जेव्हा नवरी बेशुद्ध पडली तेव्हा तिच्या डोळ्यांवर पाणी शिंपडून तिला जागं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू ती शुद्धीवर आली नाही. त्यानंतर तिला लगेचच हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिला हृद्य विकाराचा झटका आल्याचे सांगून नवरीला मृत घोषीत करण्यात आले. या घटनेमुळे ओडिशामधील लग्नघरात आनंदावर विरजन लागले आहे.

ओडिशामधील लग्नघरात शुक्रवारी ही दु:खद घटना घडली. ती नवरी ओडिशामधील जुलुंडा गावातील मुरली साहू यांची मुलगी रोजी होती. याच रोजीचे बलांगीर जिल्ह्यातील टेटलगावातील बिसीकेसनसोबत लग्न ठरले होते. लग्नातील पाठवणीचा काळ हा मुलीसाठी फार कठीण असतो. त्यामुळे परक्या घरी जाताना पाठवणीच्या वेळी मुलगी नेहमी रडत असते. परंतु रडता रडता मुलीला हृद्य विकाराचा झटका आला. हॉस्पीटलमध्ये नवरीचा मृतदेहाच्या पोस्टमार्टमनंतर परिवाराला मृतदेह सोपवण्यात आला.

जुलुंडाच्या एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार, काही महिन्यापूर्वीच तिच्या वडिलांचा निधन झाले होते. त्यामुळे रोजी ही सध्या फार ताणतणावात जगत होती.


हेही वाचा – ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देऊ!

First Published on: March 6, 2021 2:38 PM
Exit mobile version