Video: या दोन देशांमध्ये रेड लाईट एरिया सुरू; मात्र ‘नो किसिंग नो ब्रिथींग’!

Video: या दोन देशांमध्ये रेड लाईट एरिया सुरू; मात्र ‘नो किसिंग नो ब्रिथींग’!

कोरोना विषाणुच्या संसर्गाचा विळखा संपूर्ण जगाला पडला असून गेल्या तीन महिन्यांपासून बहुतांश देश लॉकडाऊन होते. मात्र आता हळूहळू देशाची स्थिती पूर्वपदावर येत असून अनेक देशांमध्ये विविध व्यवसाय सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. तर काही देशांनी वेश्या व्यवसायालाही परवानगी दिली आहे. नेदरलँड आणि थायलँड या दोन देशांच्या सरकारने वेश्या व्यवसायासाठी रेड लाईट एरिया सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्याकरता काही निर्बंध त्यांनी घालून दिले आहेत. यामध्ये चुंबन घेणे आणि दिर्घ श्वास घेण्यास त्यांनी मनाई केली आहे.

तीन महिन्यांपासून बंद असलेला बँकॉकचा रेड लाईट एरिया १ जुलैपासून सुरू करण्यात आला आहे. थायलँडच्या बार, काराओके वेन्यू, मसाज पार्लर इत्यादीदेखील उघडले आहेत. कारण गेल्या ३७ दिवसांपासून या देशात कोरोनाचे एकही रुग्ण आढळून आलेले नाही. त्यामुळे हजारो वेश्या व्यवसाय करणारे कामावर परतले आहे. याबाबतची माहिती रेयोटर्स या संस्थेने आपल्या ट्विटरवरून दिली आहे.

दरम्यान, या परिसरात जाणाऱ्यांसाठी काही निर्बंध घालून देण्यात आले असून ते आपल्या चेहऱ्यावरून मास्क काढू शकणार नाही. प्रथम स्वतःला सॅनिटाईझ करून घ्यावे लागणार आहे. चुंबन घेणे आणि वेगाने श्वास घेणे अनिवार्य आहे. तसेच या परिसरात जाण्यापूर्वी सर्व ग्राहकांचे तापमान तपासले जाईल. त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर घेतला जाईल एवढेच नाही डान्स बारमध्ये जाणाऱ्यांना स्टेजपासून दोन मीटर अंतरावर बसावे लागेल. आतल्या लोकांकडून एक मीटर अंतर ठेवले पाहिजे, असे नियम घालून दिले आहेत.

हेही वाचा –

संतापजनक! क्वॉरंटाईन सेंटरमध्ये चक्क सेक्स; अनेकांना कोरोनाची लागण

First Published on: July 3, 2020 3:41 PM
Exit mobile version