धार्मिक भावना भडकणारी BSNLची कर्मचारी निलंबित

धार्मिक भावना भडकणारी BSNLची कर्मचारी निलंबित

रेहाना फातिमा (सौजन्य-firstpost)

लोकांच्या धार्मिक भावना भडकवणाऱ्या BSNL या कंपनीच्या एका महिला कर्मचारीला कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. रेहाना फातिमा असे या महिलेचे नाव असून कंपनीने काढून टाकल्यानंतर तिला तातडीने पोलिसांनी अटक देखील केली आहे. दक्षिणेकडे अय्यप्पाला मानले जाते. अनेकांचे ते श्रद्धास्थान आहे, हे माहित असून देखील तिने त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर आहे. म्हणूनच तिला अटक करण्यात आली आहे.

पाहा- शबरीमाला राडा भाग २, तृप्ती देसाई माघारी

नेमकं प्रकरण काय?

30 ऑक्टोबर रोजी फातिमाने फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात तिने अयप्पा देवाचे कपडे घातले होते. त्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. अशा प्रकारे आमच्या देवाचे कपडे घालून हिंदूच्या भावना दुखावण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर हल्ला देखील करण्यात आला. तिच्यावर कलम २९५ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा- आरएसएसच्या नेत्याने मोडली शबरीमाला मंदिराची परंपरा

शबरीमाला मंदिरात करणार होती प्रवेश

केरळमधील शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या महिलांपैकी रेहाना फातिमा एक आहे. ती कायमच भडकावू पोस्ट सोशल मीडियावर करतच असते. त्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. शबरीमाला मंदिरात तिला प्रवेश करता आला नाही तर तिला ताब्यात घेण्यात आले.

पाहा रेहानाचे वादग्रस्त फोटो

रेहानाने कलिंगड घेऊन काढलेला टॉपलेस फोटो

 

रेहानाने अयप्पा देवाचे घातलेले कपडे

कायमच वादात असलेली रेहाना

रेहाना बीएसएनलची कर्मचारी तर आहेच पण ती नेहमीच वादग्रस्त गोष्टी करते. केरळमधील एका प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचे अवयव हे कलिंगडासारखे असतात असे सांगितले होते. त्यानंतर अनेक महिलांनी कलिंगड घेऊन फोटो काढले. रेहानाने टॉपलेस होत कलिंगड हातात घेऊन फोटो काढले. या फोटोची सुरुवात करणारी रेहानाच होती. अश्लीलतेमुळे तिचा हा फोटो फेसबुकवरुन काढून टाकण्यात आला.

लोकांची मानसिकता बदलण्याची धडपड

प्रसारमाध्यमांना ती लोकांची मानसिकता बदलण्यासाठी मी असे करते असे अनेकदा सांगते. तिने फार आधी किस ऑफ लव्ह या कार्यक्रमात भाग घेतला होता. शिवाय केरळमधील त्रिशूरमध्ये होणाऱ्या ओणम महोत्सवात टायगर नृत्य करणारी ती पहिली महिला आहे. रेहाना एका मुस्लिम कुटुंबातील असून आधी ती अशी नव्हती. मुस्लिम धर्मातील सगळ्या नियमांचे ती पालन करत होती. पण वडिलांच्या मृत्यूनंतर तिचे आयुष्य पालटून गेले.

First Published on: November 28, 2018 9:58 PM
Exit mobile version