आयपीएल प्रेमींसाठी BSNL ची नवीन ऑफर, मिळणार इंटरनेट सेवाही

आयपीएल प्रेमींसाठी BSNL ची नवीन ऑफर, मिळणार इंटरनेट सेवाही

BSNL च्या ३५ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ पॅकमध्ये ५ जीबी डेटा

सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे वारे देशात वाहत आहे. आयपीएल बघण्यासाठी क्रिकेट प्रेमी नेहेमीच उत्सुक असतात. आयपीएलमध्ये देशातील विविध शहरांचे सामने खेळले जातात. स्मार्टफोन आल्यावर अनेक क्रिकेट प्रेमी मोबाईलवरच क्रिकेटचे सामने होतात. आयपीएल हा देशातील एक मोठा सोहळा आहे. म्हणून बीएसएनएलने दोन प्लान सुरु केले आहे. यामध्ये ग्राहकांना कॉलिंग सोबतच इंटरनेट सुविधाही मिळणार आहे. ग्राहाकांना १९९ आणि ४९९ रुपयांचे प्लान बीएसएनएलने सुरु केले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवणारे हे प्लान आहेत असे बीएसएनएलने सांगितले आहे.

कसे असतील नवीन प्लान

ग्राहकांना १९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना दररोज १ जीबी २८ दिवसांपर्यंत वापरता येणार आहे. म्हणजेच १९९ मध्ये एकूण २८ जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे. याबरोबर ग्राहकांना या प्लानमध्ये कॉलींग सेवा आणि एसएमएस सेवा मिळणार आहे. ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ९० दिवसांसाठी प्रतीदिवस १ जीबी इंटरनेट मिळणार आहे. याचसोबत त्यांना कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळणार आहे. याप्लानमध्ये ग्रहाकांना एकूण ९० जीबीचा डेटा वापरायला मिळणार आहे. इंटरनेट सेवा ग्राहकांना दिल्यामुळे आता आयपीएल प्रेमी मोबाईलवर हमखास लाईव्ह सामने बघू शकणार आहे.

First Published on: March 24, 2019 3:53 PM
Exit mobile version