काँग्रेसच्या ७ जागांची गरज नाही; मायावती यांचा निर्धार

काँग्रेसच्या ७ जागांची गरज नाही; मायावती यांचा निर्धार

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती

आम्हाला तुमच्या सात जागांची गरज नाही. तुम्ही सर्वच्या सर्व ८० जागांवर निलडणूक लढवा, असे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रसेला म्हटले आहे. आमचा आणि काँग्रेसचा संबंध नाही. सपा-बसपा भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे, असा टोलादेखील त्यांनी काँग्रेसला लगावला. मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा आहे. त्यावर मायावती यांनी काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये असा इशाराही दिला आहे.

सपा-बसपा मिळून भाजपशी लढू

मायावती यांनी ट्विट करत सांगितले की, काँग्रेसने ७ जागा सपा-बसपा आघाडीसाठी सोडल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसने हा गैरसमज पसरवू नये तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये असं आवाहन केले आहे. मायावती यांनी काँग्रेसला ८० जागांवर लढावं असं आव्हान दिलं आहे. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही, हे बहुजन समाज पार्टी नेत्या मायावती यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून उठवण्यात येत असलेल्या अफवांना आमचे कार्यकर्ते बळी पडणार नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशात सर्वच सर्व ८० जागांवर निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करुन स्वबळावर निवडणुका लढवाव्या. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी मिळून भारतीय जनता पार्टीशी लढण्यात पूर्णपणे सक्षम आहे.

First Published on: March 18, 2019 3:08 PM
Exit mobile version