Black death: जगावर पून्हा ‘ब्यूबोनिक प्लेग’ महामारीचे संकट, रशियन डॉक्टरांचा इशारा

Black death: जगावर पून्हा ‘ब्यूबोनिक प्लेग’ महामारीचे संकट, रशियन डॉक्टरांचा इशारा

Black death: जगावर पून्हा 'ब्यूबोनिक प्लेग' महामारीचे संकट, रशियन डॉक्टरांचा इशारा

कोरोना विषाणूशी गेल्या दोन वर्षांपासून सर्व जग लढा देत आहे. मात्र कोरोना विषाणूचे संकट संपत नाही तोवर जगावर ‘ब्यूबोनिक प्लेग’ महामारीचे संकट येऊ घातले आहे. पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग कमी झाले नाही तर ब्यूबोनिक प्लेग महामारीने अनेकांचा जीव जाईल असा इशारा रशियन डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता सर्व देशांना ब्यूबेनिक प्लेगचा सामना करावा लागणार आहे. या आजाराने यापूर्वीच अनेकांचा जीव घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या आजारांने विविध देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. युरोपात याचा सर्वाधिक प्रसार झाला. तब्बल कोट्यावधी नागरिकांना यात जीव गेला. या आजाराला ‘काळा मृत्यू’ असे देखील म्हटले जाते.

पर्यावरणीय बदलांमुळे वाढतोय आजार

रशियन डॉक्टर अन्ना पोपोवा यांनी सांगितले की, जगभरात वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे ‘ब्यूबोनिक प्लेग’ साथीचा आजार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. गेल्या काही वर्षात रशिया, अमेरिका, चीन देशांमध्ये ‘काळा मृत्यू’ आजाराने अनेकांचा जीव गेला. या आजाराचे महाभयानक रुप आफ्रिका देशामध्ये पाहायला मिळतो. या देशातील उष्ण वातावरणामुळे येथे हा आजार पसरण्याची शक्यता सर्वाधिक आहे. यावर डॉ. अन्ना पोपोवा यांनी सांगितले की, पर्यावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे जल आणि वायू प्रदुषणात बदल होतायत. तापमान मोठ्या प्रमाणात वाढतेय. यामुळेच जगभरात आटोक्यात आलेला ‘ब्यूबोनिक प्लेग’ आजार नव्याने पसरु शकतो. या ‘काळ्या मृत्यू’ रोगाचा अनेक देश सामना करताय. या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. कारण हा आजार पसरवण्याऱ्या डासांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.

आजाराची लक्षणे 

ब्यूबोनिक प्लेग हा आजार ज्या बॅक्टेरियामुळे होतोय त्याला ‘यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरिया’ नावाने ओळखले जाते. हा बॅक्टेरिया शरारातील रक्त, फुफ्फुस आणि इतर अवयवांमध्ये पसरतो. या ब्यूबोनिक प्लेगला ‘गिल्टीवाला प्लेग’ नावाने देखील ओळखले जाते. यामुळे शरीरात असह्य वेदना, खूप ताप येणे, आणि नाडीचा वेग वाढतो.

उंदरांमुळे पसरतोय हा आजार

ब्यूबोनिक प्लेग हा आजार जंगली उंदरांमुळे होतो. उंदराच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील बॅक्टेरिया डासांद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो. यानंतर ते डास मानवी शरीराला चावा घेत संक्रमक लिक्विड मानवी शरीरात सोडतो. यामुळे मानवाला ब्यूबोनिक विषाणूचे संक्रमण होते. या उंदारांच्या मृत्यूनंतर दोन आठवड्यांनी मानवामध्ये प्लेग आजार होतो.

२०१० ते २०१५ या काळात जगभरातून ब्यूबोनिक प्लेगचे जवळपास ३२४८ प्रकरणं समोर आली. यातील ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला. यंदा कॉन्गो, मॅडागास्कर, पेरु देशातून सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. यापूर्वी १९७० ते १९८० च्या दशकात चीन, भारत, रशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अमेरिका सारख्या देशांमध्ये या आजराचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. सहाव्या आणि आठव्या दशात ब्यूबोनिक प्लेग आजाराला ‘प्लेग ऑफ जस्टिनियन’ नाव देण्यात आले. या काळ्या मृत्यूच्या बॅक्टेरियाचा वंशवृक्ष ७००० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.


 

First Published on: October 12, 2021 1:03 PM
Exit mobile version