‘पेट्रोल डिझेलवर कर लावून सर्वसामान्य जनतेचा खिसा कापलाय’

‘पेट्रोल डिझेलवर कर लावून सर्वसामान्य जनतेचा खिसा कापलाय’

एक रुपया डिझेल आणि पेट्रोलवर कर लावून सर्वसामान्य जनतेचा खिसा कापल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. केंद्रसरकारचा आज अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्य लोकांचा खिसा कापणारा हा अर्थसंकल्प असून टॅक्सवर सुद्धा कोणती सवलत न देणारा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे

पेट्रोल – डिझेल लीटरमागे १ रुपया अतिरिक्त कर

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी पेट्रोल – डिझेल लीटरमागे १ रुपया अतिरिक्त कर आकारण्यात येणार असल्याने सोने खरेदी आणि पेट्रोल – डिझेल महाग होणार आहे. तसेच तंबाखूवरही अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे.

भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधणार

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर झाला. हा अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यावेळी सीतारमण यांनी गरिबांसाठी १.९५ कोटी घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. ‘प्रत्येकाचे हक्काचे घर व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गरिबांना घरे बांधून देण्याकडे भारत सरकार गंभीरतेने करत आहे. पूर्वी घरे बांधण्यासाठी ३४० दिवस लागायचे. मात्र, आता फक्त १४० दिवसांमध्ये घरे बांधली जामार आहेत’, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

सर्व घरांमध्ये शौचालयाची व्यवस्था असणार

निर्मला सीतारमण यांनी सांगितल्यानुसार ११४ दिवसांमध्ये गरिबांसाठी १.९५ कोटी घरे बांधली जाणार आहेत. या घरांचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वान त्यांनी दिले आहे. सर्व ग्रामीण भागांमध्ये घरे बनवली जाणार असल्याचे सीतारमण म्हणाल्या.


हेही वाचा – Budget 2019 : महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात ‘या’ तरतूदी

हेही वाचा – Budget 2019 : मोदी सरकार २०२२ पर्यंत ‘हे’ पाच महत्त्वपूर्ण कामे करणार


 

First Published on: July 5, 2019 2:44 PM
Exit mobile version