budget 2022 : अनंत नागेश्वरन बनले देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

budget 2022 : अनंत नागेश्वरन बनले देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

budget 2022 : अनंत नागेश्वरन बनले देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी केंद्र सरकारने नव्या मुख्य आर्थिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. यावेळी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तात्काळ त्यांनी देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे.

केंद्र सरकार पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि त्याच मोक्यावर नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होत आहे. आर्थिक आढावा त्याच दिवशी संसदेत मांडला जाईल. तर 2022 – 23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करतील.

माजी मुख्य आर्थिक सल्लागार के. वी. सुब्रमण्यम यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करुन ते पुन्हा शिक्षण कार्यात गेल्याने हे पद रिक्त झाले होते. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी संपला.

नागेश्वरन यांच्याशिवाय या पदासाठी मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सान्याल, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे प्रोफेसर पामी दुआ, नॅशनल काउंसिल ऑफ एप्लॉइड इकोनॉमिक रिसर्च (NCAER) महासंचाकल पूनम गुप्ता यांच्या नावाचाही नियुक्तीसाठी विचार करण्यात आला होता.

पीएम मोदींचे होते सल्लागार

अनंत नागेश्वरन हे 2019 ते 2021 दरम्यान पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पार्ट – टाईम सदस्य होते. याशिवाय त्यांनी लेखक, शिक्षक आणि मार्गदर्शक अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. तसेच ते भारतातील प्रसिद्ध बिझनेस स्कूल आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे फॅकल्टी राहिले आहेत. यासोबतच ते सिंगापूरमधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक राहिले आहेत.

आयआयएम अहमदाबादमधून केले शिक्षण पूर्ण

ते IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते. याशिवाय ते क्रे विद्यापीठात अर्थशास्त्राचे व्हिजिटिंग प्रोफेसरही राहिले आहेत. अनंत नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM-A) मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे. याशिवाय त्यांनी मॅमॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डॉक्टरेटची पदवीही घेतली आहे.


 

First Published on: January 28, 2022 9:21 PM
Exit mobile version