बुलंदशहर हिंसाचार: जवानाचा पोलिसावर गोळीबार

बुलंदशहर हिंसाचार: जवानाचा पोलिसावर गोळीबार

बुलंदशहर हिंसाचार

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हिंसाचारामध्ये शहीद पोलीस निरिक्षक सुबोध कुमार यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानाने गोळी मारली आहे. एसआईटी आणि एसटीएफच्या तपासामधून हे उघड झाले आहे. जवान सुट्टीमध्ये गावाला आला होता. या जवानाने पोलीस निरिक्षकाला त्याच्या अवैध पिस्तुलमधून गोळी मारण्यात आली आहे. या घटनेनंतर जवान जम्मूला पळून गेला आहे. पोलिसांना याप्रकरणात एक मोठा व्हिडिओ मिळाला होता. ज्यामध्ये जवान गोळी मारताना स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरच्या जवानाच्या युनिट अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या जवानाला अटक करण्यासाठी बुलंदशहरवरुन पोलिसांची टीम जम्मू – काश्मीरला रवाना झाली आहे.

१५ लाख लोकं रस्त्यावर उतरले

उत्तरप्रदेशातील बुलंद शहरामध्ये गोहत्या झाल्याची अफवा उठली. बुलंदशहराच्या चिंगरावठी पोलीस ठाणे परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. ज्यामध्ये पोलीस निरिक्षक सुबोध कुमार आणि विद्यार्थी सुमित यांना गोळी लागल्याने मृत्यू झाला. जेव्हा बुलंदशहरामध्ये तणावाचे वातावरण होते त्यावेळी १५ लाख लोकं रस्त्यावर उतरले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर एडीजी इंटेलीजेंस, एसआईटी, एटीएस, एसटीएफ, क्राइम ब्रँच आणि बुलंदशहर पोलिसांनी तपास कार्य सुरु केले.

३०० जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी याप्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये एका जवानाचे नाव हत्याप्रकरणात दाखल झाले. बुलंदशहर हिंसाचार प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी या घटनेशी संबंधित जवळपास २५० व्हिडिओ गोळा केले आहेत. ज्यामध्ये हे माहिती पडत आहे की, हिंसाचाराला सुरुवात कुठून झाली आणि जमावाला कसे उत्तेजित केले गेले.

जवानाने गोळी मारल्याचे आले समोर

पोलीस निरिक्षक सुबोध कुमारला कोणी गोळी मारली आणि त्यांच्या हत्येकोर कोण आहे याचा देखील तपास सुरु आहे. तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणातला महत्वाचा व्हिडिओ मिळाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जमावावर गोळी चालवताना दिसत आहे. तपासातून ही व्यक्ती जवा असल्याचे समोर आले असून ती जम्मूमध्ये तैनात आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, याच जवानाची गोळी पोलीस अधिकारी सुबोध यांना लागली. व्हिडिओद्वारे जवानाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली. मात्र त्याठिकाणी तो सापडला नाही. सध्या तो जम्मूला पळून गेला आहे.

हेही वाचा – 

बुलंदशहर हिंसाचार; ‘धक्कादायक’ व्हिडीओ आला समोर

बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अटकेत

First Published on: December 7, 2018 12:30 PM
Exit mobile version