श्रीलंकेत बुरख्यावर निर्बंध

श्रीलंकेत बुरख्यावर निर्बंध

Burkha

धार्मिक कट्टरतावादाचा सामना करणार्‍या श्रीलंकेत आता बुरखा परिधान करण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने शनिवारी श्रीलंका लवकरच बुरख्यावर निर्बंध घालणार असल्याची माहिती दिली. याव्यतिरिक्त १ हजार इस्लामी शाळादेखील बंद केल्या जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

काही दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडमध्येही जनमत संग्रह करण्यात आला होता. त्यानंतर त्या ठिकाणी तोंड झाकून सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास निर्बंध घालण्यात आले होते. श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री सरथ वेरासेकेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकात राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर मुस्लीम महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. जर विधेयक मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आले तर श्रीलंकेची संसद यावर कायदा करू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

First Published on: March 14, 2021 11:14 PM
Exit mobile version