याला म्हणतात जिद्द! बस कंडक्टर झाला UPSC उत्तीर्ण!

याला म्हणतात जिद्द! बस कंडक्टर झाला UPSC उत्तीर्ण!

अंगी जिद्द आणि चिकाटी असली की यश तुमच्याकडेच येतं. याचाच प्रत्यय बंगळुरूमधील एका बस चालकाला आला आहे. नुकताच बंगळुरमध्ये एक बस वाहक मधु एनसी या बस कंडाक्टरने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. बंगळुरूच्या मेट्रोपोलिटीन टान्सपोर्ट सेवेत मधू बस वाहकाचे काम करतात. मधू यांची यूपीएसी परीक्षेतील मुलाखत २५ मार्चला होणार आहे.

आएएस होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मधू यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. दिवसभर ८ तासांची नोकरी आणि ५ ता यूपीएससीचा अभ्यात ते करत होते. कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. ही परीक्षा त्यांनी कन्नड या आपल्या मातृभाषेतून दिली. यूपीएससी परीक्षेसाठी मधु यांनी राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, नैतिक मूल्य, भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या विषयांची विशेष तयारी केली.

या विषयी बोलताना मधू म्हणाले, मी कोणती परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो. याबाबत माझ्या पालकांना काहीच माहिती नाही. मात्र मला मिळालेल्या यशाचा त्यांना आनंद झाला. आमच्या घराण्यात एवढे शिक्षण घेतलेला मी एकटाच आहे. असे मधू यांनी सांगितले.

कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील मालवली या छोट्याश्या खेड्यात मधु राहतात. २९ वर्षीय मधु, कुटुंबात सर्वांत मोठे असल्याने घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. वयाच्या १९ वर्षी ते बस वाहक बनले. गरिबी आणि कठीण परिस्थितीशी दोन हात करत मधु यांनी आपले स्वप्न पूर्णत्वास आणले आहे. दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मधु यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली आहे.

First Published on: January 28, 2020 3:14 PM
Exit mobile version