क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या या तरुणाला झालाय भस्म्या; एकटा खातो दहा माणसांचे जेवण

क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या या तरुणाला झालाय भस्म्या; एकटा खातो दहा माणसांचे जेवण

सध्या देश कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असून जागोजागी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग बंद पडले असून काही ठिकाणी लोकं दोन वेळेच्या जेवणालाही आतूर झाले आहेत. अशा परिस्थितीत जर कोणी दहा माणसांचे जेवण एकटा संपवत असेल तर. ऐकून आश्चर्य वाटले ना. पण हे खर आहे. बक्सर जिल्ह्यातील मझवारी येथील राजकीय बुनियादी शाळेत क्वारंटाईनमध्ये राहत असलेला हा तरुणा तब्बल दहा जणांचे जेवण खातो. ताप आल्यामुळे या तरुणांला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र इथे हा ८ ते १० प्लेट भात आणि ३५ चपात्या एकावेळी संपवत असल्याचे येथील केंद्र चालवणाऱ्या संचालकांनी सांगितले आहे. सोबत भाजी आणि डाळदेखील असते. संचालकांच्या मते हा एकटा ८० हून जास्त लिट्टी संपवतो.

हेही वाचा – कोरोनासंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख गुन्हे दाखल – गृहमंत्री

अनूपचा ताप बनली डोकेदुखी 

अनूप ओझा असे या तरुणाचे नाव आहे. तापामुळे क्वारंटाईन झालेल्या अनूपची प्रकृती पाहून त्याचा आहार किती असू शकतो, याचा अंदाज येतो. अनूप ओझा असे या तरुणाचे नाव आहे. तापामुळे क्वारंटाईन झालेल्या अनूपची प्रकृती पाहून त्याचा आहार किती असू शकतो, याचा अंदाज येतो. क्वारंटाईन सेंटरचे संचालक यांची दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे वजन ७० किलो आहे. मात्र त्याचा आहार एका पेहलवानाइतका आहे. अनूप ओझाच्या तापाने सेंटरच्या संचालकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. या सेंटरमध्ये सध्या ७० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशात २१ वर्षीय अनूप ओझाच्या आहाराचा अंदाज घेऊन तब्बल १०० जणांचे जेवण बनवावे लागत आहे. तरीही सेंटरमधील काही लोकांना जेवणाचा तुटवडा जाणवत आहे.

First Published on: May 28, 2020 10:58 PM
Exit mobile version