सीबीएसई बोर्ड १० वीचा आज निकाल

सीबीएसई बोर्ड १० वीचा आज निकाल

ऑफिशियल वेबसाइट, गुगल, एसएमएसद्वारे निकाल जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल सीबीएसईच्या वेबसाईटवर पाहता येईल. यासंबंधीची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अनिल स्वरूप यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. यापूर्वी २६ मे रोजी सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता.

असा पाहता येईल निकाल

वेबसाइट 
cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि results.nic.in.

एसएमएस 
यंदा प्रथमच निकाल पाहण्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. फक्त एसएमएसद्वारे आपण निकालाची माहिती मिळवू शकता
Microsoft SMS Organizer
या क्रमांकावर एसएमएस करा – ७७३८२९९८९९

गुगल सर्च
www.google.com, www.bing.com आणि UMANG app वर उपलब्ध

असे करा गुगल सर्च

कधी झाली परीक्षा ?
सीबीएसई बोर्ड १० वीची परीक्षा – ५ मार्च ते ४ एप्रिल २०१८
परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी – २८ लाख
परीक्षेला बसलेले विद्यार्थी – १६ लाख
देशातील एकूण परीक्षा केंद्र – ४ हजार ४५३

फेर परीक्षेची नामुष्की
सीबीएसई बोर्डाच्या १० आणि १२ परीक्षेनंतर पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते. काही शहरांमध्ये १० वीचा गणिताचा आणि १२ वी अर्थशास्त्राच्या विषयाचा पेपर पुन्हा घेण्यात आला होता. पेपरफुटी प्रकरणामुळे दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली होती. यामुळे सीबीएसई बोर्डाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.

First Published on: May 29, 2018 5:16 AM
Exit mobile version