CBSE Board 12th Exam : १२ वी परीक्षा २४ जुलैपासून होणार सुरु, शिक्षण मंत्रालयाने तयार केल्यात ३ योजना

CBSE Board 12th Exam : १२ वी परीक्षा २४ जुलैपासून होणार सुरु, शिक्षण मंत्रालयाने तयार केल्यात ३ योजना

१२ वीच्या परीक्षा रद्द करण्यावर मंत्रिमंडळात चर्चा; शिक्षण खात्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता इयत्ता १२ वीच्या परीक्षांचा तारखांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. यातच सर्वोच्च न्यायालयात १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १२ वीच्या परीक्षांसाठी तीन योजना तयार केल्या आहेत. या तिन्ही योजनांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. परंतु या योजनांवर शिक्कामोर्तब होण्यासाठी पंतप्रधानांच्या सहीची प्रतिक्षा आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून २०२१ रोजी १२ वीच्या परीक्षांचा तारखा जाहीर करतील असे सांगितले होते. त्यानुसार आज तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तारखांसह परीक्षेचे वेळापत्रक तयार केले असून त्यासंबंधीचे तीन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले आहेत.

२४ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान होतील परीक्षा 

केंद्र सरकारने जर या योजनांना सहमती दर्शवल्या सीबीएसई बोर्ड इयत्ता १२ वीच्या परीक्षा २४ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान घेण्यात येऊ शकतात. गेल्या आठवड्यात सर्व राज्यांकडून लेखी अर्ज मिळाल्यानंतर १२२ वी बोर्डच्या परीक्षांबाबत या ३ योजना तयार करण्यात आल्या आहेत. परंतु या योजनांमध्ये पीएमओंकडून काही बदल केले जाऊ शकतात.

परीक्षा फक्त मुख्य विषयांसाठी 

सीबीएसई बोर्डाच्या मदतीने तयार केलेल्या योजनेतील प्लॅन A नुसार केंद्र सरकार बारावीची परीक्षा फक्त मुख्य विषयांसाठी घेतली जाईल. यात विज्ञान, वाणिज्य व कला क्षेत्रातील फक्त तीन मुख्य विषयांची परीक्षा घेतली जाईल. यानंतर संपूर्ण निकाल तयार करण्यासाठी उर्वरित विषयांचे मार्किंगचा फॉर्म्युला मुख्य विषयांच्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे तयार केले जाईल.

प्रश्नपत्रिकेत फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न 

तर योजनेतील प्लॅन B नुसार, सीबीएसई बोर्ड मुख्य विषयांची परीक्षा ३० मिनिटे घेऊन मूल्यांकन करेल. या परीक्षा अशा प्रकारे तयार केली जाईल की प्रश्नपत्रिकेत फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. तर परीक्षेतील विषयांची संख्याही निश्चित केली जाईल. परंतु या प्रस्तावात राज्यांनी संमती दिली नसल्याचे बोलले जात आहे.

कोरोना परिस्थिती बिकट झाल्यास ९ वी ते ११ वीचे मार्क ग्राह्य धरत निकाल 

आता प्लॅन C नुसार, शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, जर देशातील बर्‍याच राज्यांत कोरोना संसर्गाची परिस्थिती चांगली नसल्यास अशा परिस्थितीत बोर्डने सर्व ठिकाणी ९ वी, १० वी आणि ११ वी इयत्तेच्या अंतर्गत असेसमेंट केले पाहिजे आणि त्याआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले पाहिजे. याआधआरे १२ वीचा निकाल जाहीर केला जाईल. परंतु या प्लॅनवर केंद्र सरकार फारसा विचार करीत नाही कारण बहुतेक तज्ञांनी असे म्हटले आहे की, बारावी परीक्षा घेणे आवश्यक आहे.

परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार

परंतु बोर्डाने आता या परीक्षेसाठी तात्पुरते वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील परीक्षा १५ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान होतील तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ६ ऑगस्ट ते २६ ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहे. यात रविवारीही परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

… तर १५ दिवसांनी पुन्हा परीक्षा देण्याची संधी 

सीबीएसईने असेही सुचवले आहे की, परीक्षेच्या सुरूवातीला कोरोना परिस्थितीमुळे अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेस उपस्थित राहणे जमले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डाची परीक्षा २०२१ साधारणतः १५ दिवसांनी घेतली जाईल. परंतु विद्यार्थ्यांना कोरोनासंबंधित स्पष्ट माहिती आणि कागदपत्रे बोर्डासमोर सादर करावी लागतील.


 

First Published on: June 1, 2021 1:30 PM
Exit mobile version