CBSE Practical Exam : दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Practical Exam : दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी २ ते १४ जानेवारीदरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बोर्डाने मानक ऑपरेटिंग प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्तवेही जारी केली आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेने वेळेत प्रॅक्टिकल परीक्षा पूर्ण करण्याचे आदेश बोर्डाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांचे गुण २ ते १४ जानेवारीपर्यंत अपलोड करण्याचे निर्देश बोर्डाने दिले आहेत. या काळात विद्यार्थी परीक्षा, प्रोजेक्ट असेसमेंट किंवा अंतर्गत मुल्यांकनामध्ये बसू शकतात. निश्चित केलेल्या दिवशी विद्यार्थी गैरहजर राहिले तर त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल.

प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याच्या निकालावरा अनुपस्थित असं नोंदवण्यात आलं. तसंच, संबंधित विद्यार्थी इतर तारखेला परीक्षा देणार असेल तर रिशेड्युल असा शेरा द्यावा, असेही आदेश बोर्डाने दिले आहेत. रिशेड्युल म्हणून चिन्हांकित केलेल्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा घेण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. इतर कोणत्याही विद्यार्थ्यांची या काळात परीक्षा घेता येणार नाही, असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यांत परीक्षा घेतल्या होत्या. मात्र, यंदा एकाच टप्प्यांत परीक्षा पार पडणार आहेत. तसंच, सीबीएसईची मुख्य परीक्षा १५ फेब्रुवारी २०२३ पासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

First Published on: December 28, 2022 8:55 AM
Exit mobile version