‘सीबीएसई’कडून दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सवलत! 

‘सीबीएसई’कडून दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सवलत! 

दिव्यांग विद्यार्थ्यांना CBSE कडून मिळणार विशेष सवलती

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (SBSE) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काही विशेष सवलती देण्याच्या विचारात आहेत. सीबीएससीकडून यासंबंधीचा एक प्रस्ताव देखील मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परिक्षा आयोजित करण्याच्या निर्णयालाही एज्युकेशन बोर्डाने संमत्ती दर्शविली आहे. खरंतर याआधी हरियाणा हायकोर्टाने दिव्यांग मुलांच्या समस्यांच्या निवारणा करण्यासाठी एक व्यापक पॉलिसी तयार करण्याचे आदेश, सीबीएसईला दिले होते. याच संदर्भातील सविस्तर आराखडा तयार करुन तो हायकोर्टात सादर करतेवेळी सीबीएसई बोर्डाकडून ही माहिती देण्यात आली आहे. SBSE कडून हायकोर्टाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष सवलतींचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात येईल. त्यानंतर तो केंद्र सरकारच्या उच्चअधिकार समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला जाईल. दरम्यान सदर प्रस्तावात बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणपद्धतीचा आणि परिक्षेमध्ये त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी शक्य झाल्यास टेक्नॉलॉजीचा देखील वापर केला जाऊ शकतो.

या सुविधांचा मिळणार लाभ

दरम्यान ‘सीबीएसई’च्या सांगण्यानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये तसंच शिक्षण घेण्याच्या पद्धतीमध्ये काही विशेष सवलती दिल्या जातील. उदाहरणार्थ, दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘विषय’ (subject) निवडीची मुभा देण्याचा विचार केला जाईल. या विद्यार्थ्यांची परिक्षा देखील कॉम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. तसंच त्यांची गैरसोय होणार नाही असेच परिक्षा केंद्र त्यांना देण्यात येईल. याशिवाय त्यांना शाळेतील उपस्थितीमध्येही सूट दिली जाईल. याव्यतिरिक्त दहावी आणि बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘फी’ मध्येही सवलत दिली जाईल.

First Published on: September 3, 2018 11:55 AM
Exit mobile version