CoronaVirus: भारतीय वंशाच्या सेलिब्रेटी शेफचा करोनामुळे मृत्यू

CoronaVirus: भारतीय वंशाच्या सेलिब्रेटी शेफचा करोनामुळे मृत्यू

भारतीय वंशाच्या सेलिब्रेटी शेफचा करोनामुळे मृत्यू

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाने अनेक मोठ – मोठ्या व्यक्तींना लागण केली आहे. यामध्ये एका भारतीय वंशाच्या एका सेलिब्रेटी शेफचाही समावेश होता. त्यामध्ये शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका वृत्ताने दिली आहे. या शेफ अमेरिकेत राहणारा होता. त्याला करोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहणारे फ्लॉएड कार्डोज (५९) यांना करोनाची लागण झाली होती. १९ मार्च रोजी त्यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. चिंतेची बाब म्हणजे ते याच महिन्यात मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत एका पार्टीचे देखील आयोजन केले होते. त्यामुळे त्या पार्टीत हजेरी लावणाऱ्या लोकांबाबतही संदिग्धता निर्माण होऊ शकते. अमेरिकेत आजवर करोना विषाणूने ७७३ लोकांचा मृत्यू झाला आहे तर भारतात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

कार्डोज यांच्याविषयी थोडक्यात…

मुंबईतील Bombay Canteen and O Pedro या प्रसिद्ध रेस्टॉरंटचे ते मालक होते. तर आता ते तिसरे जॉईंट व्हेंचर Bombay Sweet Shop सुरु केले होते. तसेच ते ८ मार्चपर्यंत मुंबईत होते. त्यानंतर ते अमेरिकेत रवाना झाले. त्यानंतर ते १८ मार्च रोजीच्या पोस्टनुसार ते न्यू जर्सीतील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना सतत ताप येत होता, अशी माहिती स्क्रोल डॉट इनने दिली असून आज त्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: १० कोटी लोकांसाठी १.५ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज


First Published on: March 25, 2020 11:48 PM
Exit mobile version