अटल जल योजनेसाठी केंद्र सरकारकडून ६ हजार कोटींना मंजुरी

अटल जल योजनेसाठी केंद्र सरकारकडून ६ हजार कोटींना मंजुरी

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. गावागावात पाणी पोहोचवण्यात यावे यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचे ठरवले आहे. यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी ६००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सहा राज्यांमध्ये पाणी सर्वदूर पोहोचणार असून त्यातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अटल जल योजनेला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा लाभ ६ राज्यांना होणार आहे. देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या सहा राज्यांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सहा राज्यांतील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास सहा राज्यांतील एकूण ८ हजार ३५० गावांना थेट फायदा पोहोचणार आहे.

अटल जल योजनेला मंजुरी मिळाल्याने गावातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारकडून ६००० कोटी रूपयांचा फंड बनवण्यात आला आहे. यात ३००० हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे असणार असून ३००० कोटी रुपये जागतिक बँक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात सहा राज्यात ही योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ८ हजार ३५० गावांत पाणी पोहोचवले जाणार असून नागरिकांची पाण्यासंबंधी जनजागृती केली जाणार आहे.

First Published on: December 25, 2019 5:29 AM
Exit mobile version