…म्हणून पीएफआयवर 5 वर्ष बंदी घातली, केंद्र सरकारने सांगितली कारणे

…म्हणून पीएफआयवर 5 वर्ष बंदी घातली, केंद्र सरकारने सांगितली कारणे

नवी दिल्ली – केंद्र सरकारने काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि इतर काहा संघटनांवर बंदी घातली आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफआरस केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. यानंतर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने पीएफआय आणि इतर संघटनांवर बंदी घालताना काही कारणे दिली असून याचा उल्लेख अध्यादेशात करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक सरकारने पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती.

बंदीसाठी केंद्राने दिली ‘ही’ कारणे –

पीएफआयने युवक, विद्यार्थी, महिला, इमाम, वकील आदी विविध घटकांमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्न  केले. त्यासाठी विविध संस्था, संघटना स्थापना केली. त्याचा उद्देश्य सभासद संख्या वाढवणे, त्यातून प्रभाव आणि निधी स्रोत वाढवणे हा होता.

First Published on: September 28, 2022 11:17 AM
Exit mobile version