Corona: केंद्र सरकारचा मदतीचा हात; राज्यांसाठी ११ हजार ०९२ कोटींचा निधी मंजूर

Corona: केंद्र सरकारचा मदतीचा हात; राज्यांसाठी ११ हजार ०९२ कोटींचा निधी मंजूर

पक्षाध्यक्ष अमित शहांच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावून पंतप्रधान मोदींनी वेगळीच चर्चा सुरु केली.

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागात त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २५४७ वर पोहोचली असून यात २ हजार ३२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर १६२ जणांना बर करून घरी पाठवण्यात आले आहे. तर आतापर्यंत देशात ६२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने आपत्कालीन निधीनुसार (SDRMF) राज्यांना तब्बल ११ हजार ०९२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिला निधी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांमध्ये क्वारंटाइन केंद्र स्थापन करण्यासाठी तसेच इतर आवश्यक बाबींसाठी राज्यांना ११ हजार ०९२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. वर्ष २०२०-२१ नुसार स्टेट डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट फंडनुसार (SDRMF) राज्यांना पहिल्या टप्प्यातील हा निधी मंजूर झाला असून यामुळे राज्यांना कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

 

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली

राज्यातील रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली. मुंबईत ४३ रुग्ण असून यात मुंबई परिसरातील १० रुग्णांचा समावेश आहे. या ४३ नव्या रुग्णांमुळे मुंबईतील आकडा २७८ वर पोहचला आहे. तसेच राज्यात ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये यात वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी १ रुग्ण असून, मुंबईतील २ रुग्ण आहेत.

हेही वाचा –

Coronavirus : निधीतून २५ लाखांपर्यंतचा खर्च करण्यास परवानगी द्या; भाजप नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

First Published on: April 3, 2020 11:02 PM
Exit mobile version