इस्रोच्या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु

इस्रोच्या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु

‘चांद्रयान-२’ १५ जुलै रोजी अवकाशात उड्डाण घेण्याच्या ५६ मिनिटे रद्द करण्यात आले होते. ‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या हेलियम टाकीतील दाब कमी झाल्याने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द करण्यात आले होते. या उड्डाणाची काऊंटडाऊन रविवारी ६.४३ वाजता सुरू करण्यात आली. चेन्नई विमानतळावर इस्रोचे अध्यक्ष के. शिवन म्हणाले, की तांत्रिक दोष आढळल्याने ‘चांद्रयान-२’चे उड्डाण रद्द करण्यात आले होते. मात्र, आज ‘चांद्रयान-२’ च्या प्रेक्षपणाची तयारी पूर्ण झाली आहे.

‘इस्रो’ने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द केल्यानंतर, शास्त्रज्ञांनी त्यातील तांत्रिक अडचण तात्काळ दूर केली. यानंतर आज, सोमवारी त्याचे उड्डाण होणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ण तळावरून सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान प्रक्षेपित केले जाणार आहे.

‘चांद्रयान-२’ आता २२ जुलैच्या उड्डाणासाठी सज्ज असून सर्व तांत्रिक बिघाड दूर करण्यात आले आहेत. हे यान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरेल, असे इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले.

First Published on: July 22, 2019 7:51 AM
Exit mobile version