‘त्या’ला हवंय श्रीकृष्णाचं बर्थ सर्टिफिकेट!

‘त्या’ला हवंय श्रीकृष्णाचं बर्थ सर्टिफिकेट!

श्रीकृष्णा

छत्तीसगडमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याने चक्क श्रीकृष्णाचे जन्म प्रमाणपत्र मागितल्याचे समोर आले आहे. मथुरा येथिल जिल्हा प्रशासनाला श्रीकृष्णाचा जन्म, जन्म वेळ, जन्म गाव, श्रीकृष्णाची लीला या सर्वांची माहिती आरटीआय टाकून या आरटीआर कार्यकर्त्याने मागितली आहे. त्यांच्या या मागणीमुळे सध्या मथुरा जिल्हा प्रशासन संभ्रमात पडले आहे.

श्रीकृष्णाचा जन्म ३ सप्टेंबरलाच झाला का?

छत्तीसगडच्या विलासपूर येथील गुमा गावचे रहिवासी आरटीआय कार्यकर्ते जैनेंद्र कुमार गेंदले यांनी एक आरटीआय टाकून मथुरा जिल्हा प्रशासनाला प्रश्न केले आहेत. त्यांनी आरटीआरमध्ये असे म्हटले आहे की, ३ सप्टेंबरला संपूर्ण देशभरामध्ये जन्माष्टमीनिमित्त सुट्टी घोषित करत श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. त्यामुळे कृपा करुन भगवान श्रीकृष्णाचे जन्म प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत उपलब्ध करुन द्यावी. ज्यामुळे हे सिद्ध होईल की, श्रीकृष्णाचा जन्म त्याच दिवशी झाला आहे.

श्रीकृष्णाच्या लीला कोणत्या होत्या?

तसंच आरटीआयमध्ये असं देखील विचारण्यात आले आहे की, श्रीकृष्ण खरचं देव होते का? जर होते तर कसे होते? त्यांची देव असण्याची प्रामाणिकता देखील उपलब्ध करुन द्यावी. आरटीाय कार्यकर्ता गेंदले यांनी असे देखील विचारले आहे की, श्रीकृष्णाचे गाव कोणते होते तसंच त्यांनी कुठे-कुठे लीला केली आहे? असे अजब सवाल त्यांनी केल्याने नेमकं काय उत्तर द्यायचे यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत आले आहे.

जिल्हा प्रशासन चिंतेत

मथुरा जिल्ह्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि जिल्हाधिकारी रमेश चंद्र यांनी सांगितले की, आरटीआर कार्यकर्त्याने जी मागणी केली आहे. त्या विषयी नेमकी काय माहिती द्यायची यामुळे सर्वजण चिंतेत आले आहेत. चंद्र यांनी सांगितले की, हिंदू धर्माशी संबंधित ग्रंथ, पुस्तक यामध्ये अशा प्रकारचे वर्णन दिले आहे की, श्रीकृष्णाचा जन्म द्वापर युगामध्ये तत्कालीन शौरसेन (सध्या मथुरा नावाने ओळखले जाते) मध्ये झाला होता. त्यांनी राजा कंसाचा वध करण्यापूर्वी द्वारका सोडण्यापूर्वी अनेक लीला केल्या होत्या. त्यामुळे धार्मिक विषयाशी जोडलेल्या या प्रश्नांना नेमकं काय उत्तर द्यायचे या संभ्रमात पडलो असल्याचे चंद्र यांनी सांगितले.

First Published on: October 5, 2018 11:01 AM
Exit mobile version