छत्तीसगढ राज्यात काँग्रेसमध्ये बंड

छत्तीसगढ राज्यात काँग्रेसमध्ये बंड

काँग्रेसचे जेष्ठनेते अमितेश शुक्ला

छत्तीसगढ येथे भूपेश बघेल यांच्या मंत्रीमंडळाची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. राज्यातील राजिम विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले काँग्रेसचे जेष्ठनेते अमितेश शुक्ला यांना मंत्रीपद न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री मंडळाच्या शपथयादीत आपले नाव नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी विरोध केला आहे. “मी पक्षातील जूना कार्यकर्ता आहे. नेहरु – गांधी कुटुंबीयांच्या तीन पिढीपासून मी त्यांना ओळखतो.” असे म्हणत त्यांनी मंत्रीपदाची मागणी केली आहे. दरम्यान छत्तीसगढ येथे १० मंत्र्यांचे शपथ विधी संपन्न झाले आहेत.

कोण आहेत अमितेश शुक्ला?

अमितेश शुक्ला हे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शुक्ला यांनी छत्तीसगढ मध्ये  बहूमतांनी विजय मिळवाला होता. त्यांच्या मतदार संघातून निवडणून आलेल्या उमेदवाराला आतापर्यंत मंत्रीपद दिले जात होते. या क्षेत्राचे प्रातिनिधित्व तिन वर्ष मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले श्यामाचरण शुक्ल करतात. हे स्थान काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.

राहुल गांधींच्या भेटीनंतरही मंत्रीपद नाही

राज्यात निडणुक जिंकल्यानंतर शुक्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. राहुल गांधींशी भेटून देखील मंत्रीपद मिळाले नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली.

कसे आहे मंत्रीमंडळ

छत्तीसगढच्या मंत्रीमंडळाची सूची क्षेत्र आणि जागतिक मुद्दे लक्षात ठेऊन बनवण्यात आली आहे. मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत असलेले काँग्रेस नेते चरंदास महंत छत्तीसगढ विधानसभेचे अध्यक्ष बनले. त्यांच्या सोबत रविंद्र चौबे, मोबम्मद अकबर,प्रेमसाय सिंग आणि कवासी लखमा यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या व्यतिरिक्त शिव डहरिया कॅबिनेट मंत्री बनले. ते काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ही आहेत. डहरिया सतनामी हे सामाजिक नेता आहे. महिला आणि आदिवसी विभागात अनिला भेडिया यांना निवडले आहे.

First Published on: December 25, 2018 2:18 PM
Exit mobile version