जशपूरमध्ये लखीमपूर घटनेची पुनरावृत्ती, कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

जशपूरमध्ये लखीमपूर घटनेची पुनरावृत्ती, कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

जशपूरमध्ये लखीमपूर घटनेची पुनरावृत्ती, कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

छत्तीसगडच्या जशपूरमध्ये लखीमपूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. जशपूरमध्ये एका भरधाव कारने मिरवणूकीत नागरिकांनी धडक देत ४ जणांचा बळी घेतला आहे तर २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. छत्तीसगडमधील जशपूरच्या रस्त्यावरून एक धार्मिक मिरवणूक जात होती. दुर्गा विसर्जनाची ही मिरवणूक होती. यावेळी अचानक एक भरधाव कार मिरवणुकीत घुसली. या भरधाव कारच्या धडकेत मिरवणूकीतील अनेक नागरिक चिरडले गेले आहेत. यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी जाळपोळीला सुरुवात केली आहे. तर मिरवणूकीतील अनेक भाविकांनी कार पेटवून दिल्य़ाची माहिती समोर आली आहे, कारने चिरडणाऱ्या आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

संपप्त नागरिकांना पोलिसांकडून शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र नागरिकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी चालक नशेत होता. तर गाडीमध्य़ेही मोठ्या प्रमाणात गांजा आढळला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

नेमकी घटना काय?

जशपूरच्या रस्त्यावरून दुर्गा देवीच्या विसर्जनाची मिरवणूक जात होती. यातील नागरिक देवीचा जयघोष करत मिरवणूकीचा आनंद घेत होते. मात्र अचानक मागून एक लाल रंगाची भरधाव कार मिरवणुकीत घुसली. यावेळी कारखाली अनेक नागरिक चिरडले गेले. मात्र नागरिकांची गर्दी पाहून कार का थांबवली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान कारमध्ये अंमली पदार्थ असल्याने कार चालकाने ती थांबवली नाही असे म्हटले जातेय. कारण चालकाने कार थांबवली असती तर तो अंमली पदार्थ्यांसह पकडला गेला असता असं म्हटले जात आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घटनेवर दु:ख व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. दरम्यान छत्तीगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या घटनेवरून राज्यातील काँग्रेस सरकारला धारेवर धरले आहे. या अपघाताची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. याशिवाय मृतांच्य़ा कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.


 

First Published on: October 15, 2021 6:21 PM
Exit mobile version