छत्तीसगडमध्ये चकमक; ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये चकमक; ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

कुपवाडामध्ये चकमक

४ नक्षलवाद्यांचा खात्मा

मिळालेल्या माहितीनुसार, मेचका ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार जंगलात शनिवारी सकाळी एसटीएफ आणि डीएफने संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांचे एसटीएफ पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असून घटनास्थळावरुन चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि त्यांच्याकडील शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.


हेही वाचा – नीरव मोदीला पीएनबी घोटाळा प्रकरणी ७ हजार कोटी परत देण्याचे आदेश


 

First Published on: July 6, 2019 1:42 PM
Exit mobile version