8 लाखांचे बक्षीस असलेल्या कुख्यात कमांडरचा खात्मा; गेल्या 13 वर्षांपासून नक्षल्यांमध्ये सक्रिय

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली, या चकमकीत आठ लाखांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवाद्याचा खात्मा करण्यास यंत्रणांना यश आले आहे. ठार झालेला नक्षलवादी हा डीवीसीएमचा कमांडर असून त्याचे नाव हडमा उर्फ सनकू असे होते. दरम्यान या नक्षलवादी कमांडरचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला आठ लाख रुपयांचे बक्षिस घोषित करण्यात आले होते.

छत्तीसगड चकमकीत ठार झालेला नक्षलवादी हडमा उर्फ सनकू आणि संभाग या जिल्ह्यातील अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. दरम्यान भेज्जी आणि बुर्कापाल सीआपपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यांच्या कटातही सनकूचा प्रत्यक्ष सहभाग होता.

सुकमा जिल्ह्यातील एएसपी ओ.पी.चंदेल यांच्या माहितीनुसार, नक्षलग्रस्त भेज्जीमधील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे डीआरजी आणि सीआरपीएफ जवानांनी परिसरात शोध मोहिम राबवली. यावेळी घेराबंदी घातलेल्या परिसरात दोन नक्षलवादी झाडावर लपून बसलेले दिसले. नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबारचे सत्र सुरु होते. गोळीबार थांबताच पोलिसांनी सर्च ऑपरेशन पुन्हा राबवत एक गणवेश घातलेल्या नक्षवाद्याचा मृतदेह आढळून आला आहे.

एएसपींच्या माहितीनुसार, ठार झालेला नक्षलवादी गेल्या 13 वर्षांपासून माढ परिसरात सक्रिय होता. या नक्षलवाद्याच्या मृत्यूमुळे नक्षलवाद्यांची दहशत कमी झाली आहे. त्यामुळे हडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले, या चकमकीनंतर परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.


अग्निसुरक्षा यंत्रणेत हलगर्जीपणा; १० नर्सिंग होमविरोधात एफआयआर

 

 

First Published on: August 1, 2022 9:50 PM
Exit mobile version