छोटा शकीलने आखला होता पुढारी, न्यायधीशांना मारण्याचा कट

छोटा शकीलने आखला होता पुढारी, न्यायधीशांना मारण्याचा कट

छोटा शकील (फोटो - इंटरनेट साभार)

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या विरोधात तक्रार दाखल केला आहे. विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार छोटा शकीलने दिल्लीतील राजकीय पुढारी आणि न्यायाधीशांना मारण्याचा कट आखला होता. त्यानुसार छोटा शकीलने आपल्या गँगला सतर्क केले होते. शकीलकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे पाठवली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या कटाचे बिंग फुटले असल्याचे कळते आहे.

विशेष पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार पोलिसांना काही व्हॉट्सअॅप मेसेजेस हाती लागले आहेत. ज्यामध्ये शकीलने प्रसिद्ध राजकीय पुढारी आणि दिल्लीतील न्यायाधीशांना मारण्याची योजना आखली होती. याबाबत संबंधित पुढारी आणि न्यायाधीशांना धोक्याची पुर्वसूचना देण्यात आली आहे.

आज तक या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिल्यानंतर छोटा शकीलने संबंधित वृत्तवाहिनीला आपला खुलासा पाठवला आहे. “मी कुणालाही मारण्याचा कट रचलेला नाही आणि माझी तशी कोणतीही योजना नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत.” असे स्पष्टीकरण छोटा शकीलने दिले आहे.

First Published on: February 7, 2020 9:44 PM
Exit mobile version