PM मोदींच्या जागी आता Vaccincination प्रमाणपत्रावर दिसणार CM ममता बॅनर्जींचा फोटो

PM मोदींच्या जागी आता Vaccincination प्रमाणपत्रावर दिसणार CM ममता बॅनर्जींचा फोटो

काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारने कोरोना लस घेणाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात पंतप्रधानांऐवजी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या फोटोसंदर्भात राजकीय गदारोळ झाला होता. यानंतर आता पश्चिम बंगाल सरकार त्याच धर्तीवर राज्यात कोरोना प्रमाणपत्र देण्यावर पंतप्रधान मोदींच्या ऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो जारी केला असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष वाढत आहे. कदाचित यामुळेच लसीकरणाच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोऐवजी आता ममता बॅनर्जी यांनी आपला फोटो लावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा तिसरा टप्पा सुरू होताच १८ ते ४४ वयोगटातील लोकांना ममतांच्या फोटोंसह कोरोना लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळीही टीएमसीने लसीकरणाच्या प्रमाणपत्र वरील पंतप्रधान मोदींच्या फोटोबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावेळी कोविड -१९ लसीकरणाच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप तृणमूलने केला होता. एवढेच नव्हे तर ममता यांनी केंद्र सरकारच्या लस धोरणावरही प्रश्न उपस्थित केले होते.

असे आहे नवं प्रमाणपत्र

याशिवाय लस वेळेवर मिळण्यासाठी ममता यांनी केंद्र सरकारला बर्‍याच वेळा घेराव घातला आहे. प्रत्येक लसीसाठी ६०० ते १२०० रुपये खर्च केले जात असल्याचे बॅनर्जी म्हणाले होते. दरम्यान १.४ कोटी लोकांना ही लस देण्यात आली आहे. वयाच्या १८ वर्षापर्यंत बंगालमध्ये ८ कोटी लोकं आहेत. त्यामुळे त्यांच्या लसीची मागणी केंद्र सरकारने पूर्ण करावी. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध औद्योगिक कक्षांना राज्य सरकारच्या आपत्ती विभागाला निधी द्यावा, अशी विनंतीही केली होती.

First Published on: June 4, 2021 10:32 PM
Exit mobile version