गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे बिहारमध्ये जदयूकडून गुन्हा दाखल

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे बिहारमध्ये जदयूकडून गुन्हा दाखल

मुंबई | बिहारी कामगारांसंदर्भात (Bihar Workers) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडचे (Janata Dal United) नेते मनिष सिंह  यांनी प्रमोद सावंत यांच्याविरोधात बिहारमधील पटाण येथे तक्रार दाखल केली आहे. बिहारी कामगारांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रमोद सावंतांनी बिहारमध्ये येऊन माफी मावावी, अशी मागणी मनिष सिंह (Manish Singh) यांनी त्यांच्या तक्रारीत केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी १ मे रोजी कामगार दिनानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात बिहारी कामगारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “गोव्यात बहुतांश गुन्हे हे यूपी-बिहारमधील लोक करतात. आणि गोव्यातील ९० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय असलेल्या बिहारच्या मजुरांचा सहभाग आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रमोद सावंत म्हणाले

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजू मांडताना म्हणाले, “बिहारमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे. १ मे रोजी कामगार दिनानिमित्ताने झालेले माझे भाषण हे कोकणी भाषेतील होते. माझे भाषण मोडून तोडून राजकीय नेत्यांनी ते ट्वीट केले आहे. माझ्या भाषणाचा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकावा आणि कोकणी भाषा समजून घ्यावी. गोव्यामध्ये सर्व राज्यातील कामगार आहेत. या परप्रांतीय कामगारांसाठी गोवा सरकारने लेबर कार्ड ही योजना आणली आहे. मी १ मे रोजी केलेल्या भाषणात लेबर कार्ड योजनेसंदर्भात सांगण्याचा प्रयत्न करत होतो. गोव्यात गुन्हे घडता कामा नये. जर गुन्हा घडला तर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी लेबर कार्ड उपयोगी ठरणार नाही. यासंदर्भात बोलताना मी परप्रांतीय कामगारांसंदर्भात वक्तव्य केले होते. जर परप्रांतीय कामगारांकडून कुठलाही गुन्हा घडला तर त्यांना शोधण्यासाठी लेबर कार्ड कसे करजेचे आहे. हे मी माझ्या कोकणी भाषेतून सांग होतो.”

 

First Published on: May 4, 2023 12:31 PM
Exit mobile version