मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, राज्याच्या विकासाला केंद्राचे सहकार्य

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, राज्याच्या विकासाला केंद्राचे सहकार्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान मोदींशी जवळपास तासभर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली. याबाबत पंतप्रदान कार्यालयाने ट्विटे केले आहे. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकऱ्यांच्या आणि कष्टकरी कामगारांच्या विकासासाठी तुम्ही पुढाकार घ्या. राज्याला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी जे सहकार्य लाभेल ते देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्रे मोदींनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर सांगितले. यावेळी शिंदे यांनी मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याचेही सांगीतले.

ट्विटमध्ये काय –

या ट्विटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, असे ट्विटमध्ये म्हंटले आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विठ्ठलाची मूर्ती त्यांनी राष्ट्रपतींना भेट दिली

या नेत्यांचीही घेतली भेट – 

नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर, आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद , भाजपाचे राष्ट्रीय अ्ध्य़क्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –

शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असून केंद्राचे सहकार्य आणि आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने ही भेट होती, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपाने एकत्रितपणे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविली होती. नागरिकांनीही या भरघोस मतदान करून युतीला विजयी केले होते. हा जनादेश ओळखून त्यांना हवे असलेले सरकार आम्ही स्थापन केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आषाढी वारीनंतर खातेवाटप –

एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी झाली असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, खातेवाटपावर आषाढी वारीनंतर चर्चा होणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. दिल्ली दौर्‍यात खातेवाटप किंवा तत्सम विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीची पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले की यासंदर्भात आम्ही एकत्रित बसून चर्चा करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published on: July 9, 2022 6:35 PM
Exit mobile version