‘उत्तर प्रदेशमधील ११ लाख मजुरांना मिळणार रोजगार’

‘उत्तर प्रदेशमधील ११ लाख मजुरांना मिळणार रोजगार’

'उत्तर प्रदेशमधील ११ लाख मजुरांना मिळणार रोजगार'

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वच जण लढत आहेत. मात्र, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश काही आलेले नाही. त्यामुळे विविध राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, मजुरांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विविध राज्यातून उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेल्या मजुरांना रोजगार मिळणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

‘या’ कंपन्या देणार नोकऱ्या

लॉकडाऊमुळे विविध राज्यात काम करणारे मजूर आता त्यांच्या गावी दाखल झाले आहेत. या मजुरांना रोजगार मिळावा याकरता उत्तर प्रदेशच्या सरकारने इंडियन इंडस्ट्रीजसोबत मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग (एमओयू) वर स्वाक्षरी केली आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की, यामुळे तब्बल ११ लाख मजुरांना रोजगार देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे विविध राज्यातून दाखल झालेल्या मजुरांकरता हे एमएयू करण्यात आले आहे. तसेच या मजुरांची स्किल मॅपिंग देखील करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या नेहरू इंडियन इंडस्ट्रीज असोसिएशन (आयआयए) ने ५ लाख मजुरांची मागणी केली आहे. तर नरडेको (नॅशनल रीअल इस्टेट डेवल्पमेंट काउंसिल) ने अडीच लाख आणि कंफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआई) ने २ लाख मजुरांची मागणी केली आहे. आयइआइए आणि सीआयआय एमएसएमइ इकाइर्स आणि नरडेको रियल एस्टेट या संस्था मजुरांना काम देणार आहेत. याशिवाय इतर औद्योगिक संस्थांकडून १.५ लाख मजुरांची मध्य प्रदेश सरकारने मागणी केली आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार


 

First Published on: May 29, 2020 8:01 PM
Exit mobile version