children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार Covaxin

children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार Covaxin

children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार Covaxin

कोरोना महामारीच्या नव्या लाटेच्या भीतीने आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 12 वर्षांपेक्षा लहान मुलांनाही कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे. यासाठी दोन लसींची निवड करण्यात आली आहे. 5-12 वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax आणि 6-12 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin लस दिली जाईल. असे सांगण्यात आले आहे. DCGI ने या लसींना आपत्कालीन वापरासाठीची मान्यता दिली आहे. यासोबतच 12 वर्षांवरील वयोगटासाठी 2 डोस असलेल्या ‘ZyCoV-D’ लसीला मंजूरी दिली आहे.

हे लसीकरण केव्हा आणि कुठे मिळणार हे स्पष्ट नाही. 27 एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत कोविड लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

कोरोनाच्या याआधीच्या लाटेत मुले फारशी आजारी पडत नव्हती, परंतु यावेळी नवीन XE व्हेरिएंटमुळे मुलं आजारी आजारी पडत आहेत. विशेषत: शाळा सुरू झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणे वाढली आहेत.

अशा परिस्थितीत मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली तरी पालकांनी घाबरण्याची गरज नाही, कारण मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अतिशय सौम्य असतात आणि वेळीच उपचार घेतल्याने मुलेही लवकर बरी होत आहेत. परंतु ही लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविडपासून वाचवण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली होती. आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई पोलीस कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत, वळसे पाटलांचा विरोधकांवर पलटवार

First Published on: April 26, 2022 3:00 PM
Exit mobile version