कोरोनाचा कहर असताना चीन करतंय पहिल्या मंगळ मोहिमेची तयारी!

कोरोनाचा कहर असताना चीन करतंय पहिल्या मंगळ मोहिमेची तयारी!

जगभर कोविड -१९ च्या साथीचा कहर सुरू असताना या दरम्यान आपल्या पहिल्या मंगळ मोहिमेचा एक भाग म्हणून ‘रोवर’ पाठवण्याची तयारी चीनची सुरू आहे. त्यासाठी ‘लाँग मार्च -५ रॉकेट’ लाँचिंगच्या ठिकाणी नेण्यात आले आहे. चीनकडून ‘तियानवेन-१’ नावाची ही मंगळ मोहीम ‘रेड प्लॅनेट’ (मंगळ) साठी येणाऱ्या तीन मोहिमांपैकी एक आहे, त्यातील एक अमेरिकेचे आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) चे मिशन आहे.

लाँग मार्च -५ रॉकेट हे चीनमधील सर्वात मोठे भार वाहक प्रक्षेपण यान असून याचा तीन वेळा वापर करण्यात आला आहे. चीनची पहिली मंगळ मोहीम म्हणून ओळखल्या जाणार्‍या तियानवेन -१ चा उद्देश वैज्ञानिक आकडेवारी गोळा करण्यासाठी ‘रेड प्लॅनेट’ (मंगळ) वर रोवर उतरविणे हा आहे. जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये हेनान प्रांताच्या दक्षिणेकडील बेटावरील वेनचांग स्पेस लॉन्च सेंटर येथून रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी माध्यमांनी चीनच्या राष्ट्रीय अवकाश प्रशासनाच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे. चीनची ही मोहिम त्यांच्या अंतराळ कार्यक्रमात सर्वात महत्वाकांक्षी मानली जात आहे.

कोरोना विषाणूचा साथीचा उद्रेक असूनही, मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे, तर युरोप आणि रशियाने या उन्हाळ्यात मंगळावर रोवर पाठविण्याची योजना पुढे ढकलली आहे. अमेरिका ‘पर्व्हरेन्स’ नावाचे कारपेक्षा मोठ्या आकाराचे रोवर पाठवत आहे. ते रोवर तेथील खडकांचे नमुने गोळा करणार असून आणि सुमारे १ दशकात विश्लेषणासाठी पृथ्वीवर आणणार आहे. याचे प्रक्षेपण ३० जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधील अमाल किंवा ‘होप’ नावाचे अंतराळयान युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरच्या भागीदारीत तयार केलेला लवाद असून सोमवारी जपानमधून त्याचे प्रक्षेपण होणार आहे. अरब जगातील पहिला आंतर-ग्रह अभियान असणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अमेरिका हा एकमेव देश आहे ज्याने मंगळावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले असून आठ वेळा हा पराक्रम केला आहे.


Coronavirus: या देशावर आलीय ९३ हजार प्राण्यांची कत्तल करण्याची वेळ

First Published on: July 17, 2020 8:39 PM
Exit mobile version