इथिओपियन विमान दुर्घटनेनंतर चीनने केल्या ८ विमान सेवा बंद

इथिओपियन विमान दुर्घटनेनंतर चीनने केल्या ८ विमान सेवा बंद

इथिओपियन विमान

इथिओपियन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ हे विमान आदीसवरून नैरोबीला जात असताना कोसळले. या दुर्घटनेत ६ भारतीय नागरिकांसह १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर चीनने आपल्या सर्व विमान कंपन्यांना बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांची सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विमानांच्या सुरक्षेबाबत सर्व गोष्टींची खात्री झाल्यानंतरच बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांची सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असे चीनच्या नागरी उड्डाण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विमानाला अपघात होण्याची दुसरी घटना

इथिओपियाची राजधानी आदीस अबाबा येथून नैरोबीकडे निघालेले बोईंग ७३७ हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच रविवारी कोसळले होते. बोईंगच्या नवीन विमानाला अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये लायन एअर बोईंग ७३७ मॅक्स ८ हे विमान जावा समुद्रात कोसळले होते. या दुर्घटनेत १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते काहीवेळातच कोसळले आहे. इथिओपियन एअरलाइन्स विमानाच्या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

६ भारतीयांचा मृत्यू

इथिओपियन एअरलाइन्स विमानाच्या दुघर्टनेत भारतातील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी संबंधित कुटुंबाला मदत करण्याचे निर्देश दूतावासाला दिले आहेत. या विमान दुर्घटनेतील मृतांची नावेही स्वराज यांनी प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये वैद्य पन्नागर भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकारवारपू मनीषा आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश इथोपियातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आले आहेत.

First Published on: March 11, 2019 2:50 PM
Exit mobile version