चक्क AI च्या माध्यमातून मृत आजीशी मुलगा करतो बातचीत, व्हिडीओ व्हायरल

चक्क AI च्या माध्यमातून मृत आजीशी मुलगा करतो बातचीत, व्हिडीओ व्हायरल

आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या जगात काहीही करणे शक्य आहे. याचा फायदा विविध कामांसाठी घेतला जात आहे. काही प्रकरणांत तर याचा ऐवढा फायदा घेतला जातो की, ते ऐकून सुद्धा हैराण व्हायला होते. असेच काहीसे एका व्यक्तीने केले आहे. त्याने AI च्या मदतीने आपल्या मृत आजीला जीवंत केले आहे. या दरम्यान त्याने AI कॅरेक्टर (आजीचे वर्च्युअल वर्जन) सोबत बातचीत सुद्धा केली. याचा ऑडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. याबद्दल लोक हैराण तर झालेच आहेत. पण वाद सुद्धा यामुळे निर्माण झाला आहे.

खरंतर हे प्रकरण चीन मधील आहे. व्हिडीओ २४ वर्षीय के वू याने असे म्हटले की, “आजी, माझे बाबा आणि मी तुझ्यासोबत लूनर न्यू ईअर साजरा करण्यासाठी पुन्हा होम टाउनला जाणार आहोच. वडिलांनी शेवटचा तुला फोन केला होता. तेव्हा तु त्याला काय म्हणाली होतीस?”

यावर आजीने उत्तर देत असे म्हटले की, मी त्यांना म्हटले होते की, वाइन घे. बचत कर आणि पत्ते खेळू नकोस.

कोरोनामुळे झाला होता आजीचा मृत्यू
व्हिडीओत वू असे म्हणतोय की, हा आजी, तू त्यांना असेच करायला सांगितले पाहिजे. माझे वडील जवळजवळ ५० वर्षांचे झाले आहेत. आता सुद्धा ते रोज वाइन पितात. त्यांच्याकडे काहीच बचत नाही. आजी, तू लूनर न्यू ईयर साजरा करण्यासाठी काय खरेदी केलेयं?

याच्या उत्तरात AI वरील आजी असे म्हणते की, मी खाण्याच्या तेलाची बॉटल खरेदी केली आहे. जे तेल शेतकऱ्यांनी स्वत: तयार केले आहे. त्याचा उत्तम वास येत आहे. एक बॉटेल ७५ युआनची आहे. बातचीतच्या दरम्यान AI वरील आजीचे हावभाव खरे असल्याचे दिसून येत होते. वू आपल्या आजीवर खुप प्रेम करत होता. तिचा मृ्त्यू वयाच्या ८४ व्या वर्षी जानेवारी महिन्यात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. वू च्या पालकांचा घटस्फोट झाल्यानंतर आजीनेच त्याचे पालपोषण केले होते. वू शंघाई मधील वर्च्युअल आर्ट डिझाइनरची नोकरी करत होता.

आजीची प्रकृती बिघडल्यानंतर तो घरी आला होता. तेथे तो १५ दिवस राहिला पण तिला अखेरचे गुड बाय करु शकला नाही. कारण त्याची आजी मृत्यूपर्यंत कोमा मध्येच होती. अशातच तिचे असे जाणे मनाला धक्का लावणारे होते. त्यामुळेच त्याने एआयच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली.

 


हे देखील वाचा: आनंदाची बातमी! बुधादित्य राजयोगाने ‘या’ 3 राशींची होणार चांदी

First Published on: April 17, 2023 5:30 PM
Exit mobile version