China Lockdown: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शहरात लॉकडाऊन

China Lockdown: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शहरात लॉकडाऊन

China Lockdown: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शहरात लॉकडाऊन

जगभरातील काही देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे, परंतु काही देशांमध्ये अजूनही कोरोनाची परिस्थिती चिंतेची आहे. यापैकी एक म्हणजे चीन. ज्या देशातून कोरोनाचा प्रसार झाला त्या चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. यामुळे चीन सरकारला पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. चीनच्या ९० लाख लोकसंख्या असलेल्या पूर्वकडील शहर चांगचुनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले.

चीन सरकारने दिलेल्या आदेशानुसार, लोकांना घरातचं राहावे लागले आणि तीन टप्प्यातील चाचण्यांना सामोर जावे लागले. तसेच अनावश्यक व्यवसाय बंद केले असून वाहतूकीवर देखील निर्बंध लादण्यात आले आहे.

स्थानिय ट्रान्समिशनचे ३९७ केसेस

शुक्रवारी चीनमध्ये स्थानिय ट्रान्समिशनचे ३९७ केसेस आढळल्या आहेत. ज्यामध्ये ९८ केसेस जिलिन प्रांतमध्ये आढळले आहेत. तर शहरात फक्त दोन केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यादरम्यान आरोग्य आयोगाने म्हटले की, चीन पहिल्यांदा वेगाने अँटीजेन चाचणी सुरू करेल. कारण कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दरम्यान २०१९ वर्षाच्या शेवटी चीनमध्ये कोरोनाची पहिली केस आढळली होती. त्यावेळी चीन सरकारने आपल्या सीमा बंद करून स्नॅप लॉकडाऊन लावला आणि मोठ्या प्रमाणात चाचणी करून कोरोनावर नियंत्रण मिळवले. चीनच्या केंद्रीय आर्थिक नियोजन एजेंसीने अलीकडेचे इशारा दिला आहे की, ‘मोठा लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवू शकेल.’ तसेच चीनचे एक ज्येष्ठ वैज्ञानिकांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ‘देशाला इतर देशांप्रमाणे व्हायरससोबत जगण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.’


हेही वाचा – Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका झाला मालामाल, तर चीनची झाली चांदी


First Published on: March 11, 2022 8:31 PM
Exit mobile version