आता संघर्ष आणखी वाढणार, हॉंगकाँगवरही चीनचा ताबा?

आता संघर्ष आणखी वाढणार, हॉंगकाँगवरही चीनचा ताबा?

hongkong - china

चीनने संसदेशमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर केला आहे. या कायद्याअंतर्गत चीनला हाँगकाँगवर कब्जा मिळवण्यात यश आलं आहे. हाँगकाँगला २३ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी चीनकडे सोपवले होते. मात्र हाँगकाँगमध्ये कायदे वेगळे होते. चिनचे सगळे कायदे चीनमध्ये लागू नव्हते. त्यामुळे चीनला आपल्या पद्धतीने तिथे कारभार करता येत नव्हता. पण आता चीनचा मार्ग मोकळा झाला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

मागच्यावर्षी झालेलं आंदोलन

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीमध्ये एकमताने हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. हाँगकाँग १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत. त्यामुळे चीनचे सर्व कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत. हाँगकाँगमध्ये आत्तापर्यंत स्वायत्ता होती. मात्र चीनच्या संसदेत मंजूर झालेल्या या कायद्यामुळे आता हाँगकाँगला चीनचे कायदे, नियम पाळावे लागणार आहेत. मागच्यावर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलन झाले होते.

संघर्ष वाढणार

१९९७ साली ब्रिटनकडून हाँगकाँग चीनकडे सोपवताना या प्रदेशाला स्वायत्तता देण्यात आली होती. मात्र आता या नव्या कायद्यामुळे चीनचा अनेक देशांशी संघर्ष वाढणार आहे. अमेरिका, ब्रिटन आणि अन्य पाश्चिमात्य देशांबरोबर संघर्ष वाढणार आहे. याच प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने त्यांच्या विशेष कायद्यातंर्गत हाँगकाँगला दिलेले स्पेशल स्टेटस रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हाँगकाँगला करण्यात येणारी संरक्षण साहित्याची निर्यात सुद्धा थांबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.


हे ही वाचा – ‘चीनी अ‍ॅप्स बॅन करणं हे कोरोना घालवण्यासाठी टाळ्या वाजवण्यासारखं आहे’


 

First Published on: June 30, 2020 6:04 PM
Exit mobile version