शाळेकडून विद्यार्थ्यांचा डुकरांची पिल्ल देऊन सत्कार

होतकरु विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा नेहमीच तत्पर असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना सत्कार, प्रमाणपत्र,मेडल यासारख्या भेटी देऊन गौरवतात. त्यामुळे विद्यांर्थ्यांचा हुरुप वाढून त्यांनी अधिकाधिक प्रगती करावी हा त्या मागचा हेतू असतो. पण चीनमधील एका शाळेने हुशार विद्यार्थ्यांना डुकरांची पिल्ल देऊन सन्मान केला आहे. यामुळे शाळेच्या या अनोख्या भेटीची जगभऱात चर्चा होत आहे.

चीनमधील यिलियांग कौंटी येथील शियांगयांग एलिमेंट्री शाळेत ही घटना घडली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृतसंकेतस्थळाने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार शियांगयांग एलिमेंट्री या प्राथमिक शाळेने वर्षभरात परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्या २० विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार केला. या सत्कार संमारंभाला मुलांचे पालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेने मुलांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, मेडल न देता त्यांच्या हातात थेट डुकरांची पिल्लंच ठेवली. यामुळे मुलांसह स्टॅजवर असलेले प्रमुख पाहुणे, पालक आणि उपस्थित विद्यार्थीही भांबावले. एवढेच नाही तर डुकरांची ही भेट फक्त मुलांसाठी नसून ती त्यांच्या पालकांसाठी देखील आहे असेही शाळेने म्हटलं. तसेच सध्या जरी याचा त्यांना काही फायदा होणार नसला तरी भविष्यात मात्र हे जनावर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मुलांनी कायम पालकांवर निर्भर राहू नये याच उ्ददेश्यातून ही डुकर मुलांना भेट दिल्याचं शाळेने म्हटले आहे. चीनी मिडियावर शाळेच्या या अजब भेटीची चर्चा असून आता जगभरात मुलांच्या हातात डुकरांचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

 

 

First Published on: January 17, 2022 2:48 PM
Exit mobile version