VIDEO : बापरे! पाण्यालाच लागली आग

VIDEO : बापरे! पाण्यालाच लागली आग

VIDEO : बापरे! पाण्यालाच लागली आग

आग लागल्याची घटना घडली का ती आग विझवण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. तसेच अग्निशमक दलाचे जवान देखील पाण्याचे फवारे मारुन आगीवर नियंत्रण मिलवतात. मात्र, आग विझवणाऱ्या पाण्याला कधी आग लागल्याचे पाहिले आहे का? यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. चीनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चक्क नळात वाहणाऱ्याला पाण्याने पेट घेतल्याचे दिसत आहे.

काय आहे या व्हिडिओत?

चीनच्या ईशान्य चीनमधील लिओनिंग प्रांतातील पांझिन शहरातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाण्याजवळ जाऊन लायटर लावताना दिसत आहे. लायटर लावताच पाण्यानं काही वेळातच पेट घेतल्याचे दिसते. ही आग हळू हळू संपूर्ण पसरते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेन नावाच्या महिलेने पोस्ट केला असून अवघ्या काही सेकंदात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

पाण्याला अशी लागली आग?

व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या महिलेने सांगितले आहे की, तिचे कुटुंब गेल्या चार वर्षांपासून त्रस्त आहेत. तसेच हात धुऊन किंवा भांडी पाण्याने स्वच्छ केल्यावर हात कोरडे दिसत नव्हते. त्या पाण्यात एक चिकटपणा होता. याबाबत पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीकडे तक्रार केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की हे त्यांच्या हातात नाही. ही समस्या गावातील शेकडो कुटुंबांची आहे.

अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करून, असे म्हटले आहे की, भूगर्भातील पाण्यात कमी प्रमाणात नैसर्गिक वायू गळतीमुळे हे पाणी ज्वलनशील झाले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तर, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी नुकताच जल स्टेशन दुरुस्तीमुळे भूजलपुरवठा सुरू झाला आहे. त्याचबरोबर संबंधित कर्मचार्‍यांना यासाठी जबाबदार धरले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.


हेही वाचा – एवढंच होतं बाकी! लाच घेण्यात आशिया खंडात ‘भारत’ अव्वल


 

First Published on: November 26, 2020 7:35 PM
Exit mobile version