अखेर चीनला उपरती; सीमेवरचं सैन्य मागे घ्यायला सुरुवात!

अखेर चीनला उपरती; सीमेवरचं सैन्य मागे घ्यायला सुरुवात!

संग्रहित छायाचित्र

गेल्या तीन आठवड्यांपासून भारत आणि चीन सीमेवर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता हळूहळू निवळायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ली ही यांच्याशी चर्चा केल्यानंतर चीनने गलवान प्रांत आणि आसपासच्या सीमा भागातून आपल्या सैनिकांच्या तुकड्या मागे घ्यायला सुरुवात केली आहे. रविवारी अजित डोवाल आणि वांग ली यांच्यामध्ये सीमाभागातील तणावपूर्ण परिस्थीतीवर फोनवर चर्चा झाली. यानंतर जाहीरपणे चीनने जरी माघारीची घोषणा केली नसली, तरी चीनी सैन्य माघारी जायला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे गलवान प्रांतात झालेल्या चकमकीपासून निर्माण झालेला तणाव आता कमी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

दोन्ही देशांमध्ये संबंध तणावपूर्ण झालेले असताना त्यावर बोलणी करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. भारताकडून यासाठी अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून चीनकडून त्यांचे परराष्ट्रमंत्री वांग ली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये सीमाभागात शांती प्रस्थापित करण्याबाबत बोलणी झाली. शिवाय भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यावर देखील दोघांची सहमती झाल्याचं समजतंय. सीमाभागातून टप्प्याटप्प्याने सैन्य तुकड्या मागे घेण्यावर सहमती झाल्याचीही माहिती आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार त्याचाच भाग म्हणून आता चीनने गलवान प्रांतातून सैन्य तुकड्या मागे घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, सीमाभागात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यापुढे देखील दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू राहील, असं देखील यावेळी ठवण्यात आल्याची माहिती आहे.

First Published on: July 6, 2020 3:43 PM
Exit mobile version