चीनमध्ये मुलाने आईला जिवंतपणीच पुरलं, तीन दिवसानंतर घडलं असं…

चीनमध्ये मुलाने आईला जिवंतपणीच पुरलं, तीन दिवसानंतर घडलं असं…

प्रातिनिधीक फोटो

चीनच्या उत्तर भागात एका मुलाने आपल्या जिवंत आईला कबरमध्ये पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार आरोपीने त्याच्या आईला कबरमध्ये पुरले. मात्र, नंतर या महिलेला गंभीर जखमी अवस्थेत सुरक्षितपणे जिवंत कबरमधून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी या आरोपी मुलाविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, २ मे रोजी तिचा नवरा आपल्या आईला व्हिलचेयरवरून कुठेतरी घराबाहेर घेऊन गेला होता. आई तीन दिवसांपर्यंत घरी परत आली नाही, तेव्हा या प्रकाराबद्दल पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना शांक्सी प्रांताच्या जिंगबियान काउंटी या ठिकाणी घडली असल्याचे समोर आले आहे. ५८ वर्षीय आरोपीची ओळख पोलिसांनी उघड केली नाही. तसेच कबरमधून बाहेर काढल्यानंतरही ७९ वर्षीय महिला मदतीसाठी याचना करत राहिली, असे बचाव करणाऱ्या लोकांनी सांगितले.


ऑनलाइन क्लास सुरू असताना विद्यार्थ्याने शेअर केला अश्लील फोटो आणि…

चायना डेली वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीची आई अर्धांगवायू अवस्थेत होती. या अर्धांगवायू झालेल्या आईची सेवा करत असताना तो वैतागला होता त्यामुळे मुलाने हे पाऊल उचलले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे या वृत्तात सांगण्यात येत आहे.

First Published on: May 8, 2020 9:54 PM
Exit mobile version