भारताच्या अनेक टॉप कंपन्यांत चीनची गुंतवणूक

भारताच्या अनेक टॉप कंपन्यांत चीनची गुंतवणूक

भारतात गेल्या काही दिवसांपासून चीनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पेटीएम (Paytm), ओला (Ola), झोमॅटो (Zomato) आणि मेक माय ट्रिप (Make My Trip) यासारख्या अनेक टॉप कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक आहे. या कंपन्यांत चीनची गुंतवणूक असल्याची माहिती समोर आल्यानंतर युजर्स आता आपला राग प्ले स्टोरवर काढत आहेत. भारतात अनेक मोठ्या स्टार्ट अॅप्सची फंडिंग चीनकडून केली जाते. म्हणेजच भारतातील कंपन्यांत चीनची मोठी गुंतवणूक आहे. युजर्स यामुळे खूप नाराज झाले असून ते आपला राग प्ले स्टोरवर व्यक्त केला जात आहे.

भारतीय अॅप्सना प्ले स्टोरवर युजर्सकडून कमी रेटिंग

या अॅप्सना प्ले स्टोरवर निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा करीत आहेत. गेल्या आठवड्यापासून या अॅप्सच्या रेटिंगमध्ये खूप घसरण पाहायला मिळत आहे. भारतात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचे शेअर्स भारतात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचा दबदबा आहे. मार्केटमध्ये या कंपन्यांचे मोठे शेअर्स आहेत. मार्च २०२० मध्ये Xiaomi, Oppo आणि Vivo यासारख्या कंपन्यांचे मार्केट शेअर ७३ टक्के होते.

युजर्स करतायत भारतीय अॅप अनइन्स्टॉल

ज्या भारतीय अॅप्समध्ये चिनची गुंतवणूक आहे. त्या अॅप्सला युजर अनइन्स्टॉल करीत आहेत. या अॅप्सना चीनची सर्वात मोठी इंटनरनेट कंपनी Tencent, Alibaba कडून फंडिंग होते. फंडिंग घेतली असली तरी या कंपन्या भारतीय आहेत. तसेच कंपन्यांचे मालक सुद्धा भारतीय आहेत.

कंपन्या बोलायला नकार देत आहेत

या संपूर्ण प्रकारानंतर पेटीएम, झोमॅटो आणि ओला सारख्या कंपन्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच भारतात चिनी मालांचा बहिष्कार दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, सध्या तरी युजर्स आपला राग प्ले स्टोरवर व्यक्त करीत आहे.

First Published on: June 22, 2020 2:53 PM
Exit mobile version