धक्कादायक! कच्चा मासा खाल्याने त्याच्या संपूर्ण शरीरात झाल्या अळ्या आणि…!

धक्कादायक!  कच्चा मासा खाल्याने त्याच्या संपूर्ण शरीरात झाल्या अळ्या आणि…!

मासा

गेल्या काही दिवसांपासून प्राण्यांचे मांस खाण्याच्या पध्दतीवरून चीनवर टीका केली जात आहे. त्यांच्या या मांस खाण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनही चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये काही ठिकाणी तर कच्च मांस खाल्लं जातं. मात्र अशाप्रकारे कच्च मांस खाणं एका चिनी व्यक्तीला चांगलच महागात पडलं आहे.

चीनमधील एका व्यक्तीने मासा न शिजवता कच्चाच खाल्याने त्याच्या यकृताला संसर्ग झाला आणि त्यामुळे विषाणुंनी त्याचे अर्धे यकृत खाल्ले. वैद्यकीय अहवालानुसार पॅरासाइट टॅपवर्म म्हणजेच परजीवी अळ्यांनी या व्यक्तीच्या यकृतामध्ये अंडी घातली आणि त्यामधून जन्माला आलेल्या आलेल्या अळ्यांनी यकृताचा बराचसा भाग खाल्ला.

५५ वर्षीय रूग्णाला भूक न लागणे, पोटदुखी, चक्कर येणं या सारखे त्रास होऊ लागले. तो तपासणीसाठी रूग्णालयामध्ये गेला. हँगझोहू फर्स्ट पिपल्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या व्यक्तीला मागील चार महिन्यांपासून हा त्रास होतं होता. मात्र चार महिने आजार अंगावर काढल्यानंतर ही व्यक्ती तापसणीला आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

डॉक्टरांनी या व्यक्तीचे सीटीस्कॅन रिपोर्ट पाहिजे तेव्हा त्यांना धक्काच बसला. या व्यक्तीच्या यकृताच्या डाव्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पू झाला होता. तसेच या भागामध्ये त्यांना १९ सेंटीमीटर लांब व १८ सेंटीमीटर रूंदीच्या आळ्या आढळल्या. तसेच या व्यक्तीच्या यकृतामध्ये ट्युमर्सही आढळून आले.

या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या यकृतामध्ये ज्या द्रव्यावर या अळ्यांचे पोषण होतं होते ते बाहेर काढले. त्यामुळेच डॉक्टरांनी या व्यक्तीच्या यकृताचा खराब झालेला भाग काढून टाकला. या भाग बाहेर काढण्यात आला तेव्हा त्यामध्ये या अळ्यांची अनेक अंडी आढळून आली. डॉक्टरांनी या माशाच्या माध्यमातूनच रुग्णाच्या शरीरामध्ये टॅपवर्म गेल्या आणि त्यांनी यकृतामध्ये अंडी घातल्याने त्यांची संख्या वाढल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


हे ही वाचा – तुमचा जोडीदार सोशल मीडियावर जास्त रमतोय, वेळीच सावध व्हा…!


Chinese Man Loses Half His Liver After Eating Raw Fish Riddled With Flatworms
First Published on: July 23, 2020 3:05 PM
Exit mobile version