भारतीय ख्रिस्ती उद्योजकाने केली ३ लाख डॉलर्सची मशीद दान!

भारतीय ख्रिस्ती उद्योजकाने केली ३ लाख डॉलर्सची मशीद दान!

ख्रिस्ती उद्योजकाने केली मशीद दान

संयुक्त अरब अमिरातीत व्यवसाय चालवणाऱ्या भारतीय ख्रिस्ती व्यवसायिक उद्योजकाने आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांसाठी मशीद बांधून ती दान दिल्याची घटना स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. शाजी चेरियन या ४९ वर्षांच्या व्यावसायिकाने फुजैरा या शहरात ही मशीद बांधली असून, त्यासाठी तीन लाख अमेरिकी डॉलर एवढा खर्च आला आहे.

शाजी हे मूळचे केरळमधील कायमकुळम येथील असून ते २००३ साली संयुक्त अरब अमिरातीत आले होते. त्यांनी आपल्या मुस्लीम कामगारांसाठी ही मशीद बांधली. ‘मरियम उम्म ईसा’ असे या मशिदीचे त्यांनी नाव ठेवले आहे. या मशिदीत एका वेळेस २५० जण नमाज पठण करू शकतात. या मशिदीचे बांधकाम एक वर्षांपूर्वी सुरू झाले होते व ते नुकतेच पूर्ण झाले.
माझ्या कर्मचाऱ्यांना जवळच्या मशिदीत जाण्यासाठी टॅक्सी करावी लागत होती. फुजैरा शहरात किंवा अन्य ठिकाणी शुक्रवारच्या नमाजासाठी जाण्यासाठी त्यांना २० दिरहॅम खर्च करावे लागत होते. हे पाहिल्यानंतर ही मशीद बांधण्याचे ठरवले, असे शाजी यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.

शाजी यांच्या या मशिदीला आर्थिक तसेच अन्य प्रकारची मदत करण्याची तयारी अनेकांनी दाखविली. यात सरकारी खात्यांचाही समावेश होता. मात्र त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. त्यांनी दिब्बा शहरात एक चर्चही बांधले आहे.

First Published on: May 19, 2018 5:53 AM
Exit mobile version