अमरावती जमीन घोटाळा प्रकरण: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या विरोधात CID ची नोटीस

अमरावती जमीन घोटाळा प्रकरण: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या विरोधात CID ची नोटीस

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रमुख चंद्रबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या अमरावती जमीन घोटाळा प्रकरणातील अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणात सीआयडी (Criminal Investigation Department) ने त्यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय माजी राज्यमंत्री पोंगुरू नारायण यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दोघांनाही या प्रकरणाच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना २३ मार्च रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. राज्यातील ६ सीआयडी अधिकारी चंद्रबाबू नायडू यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना चौकशीत सहभागी होण्याची नोटीस दिली. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ अन्वये नायडू यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सीआयडीने चंद्रबाबू नायडू यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार,कलम १६६, १६७ आणि २१७ अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. चंद्रबाबू नायडू यांना २३ मार्च रोजी चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. याशिवाय सीआयडीने शैक्षणिक संस्था गट चालवणारे मुख्य व्यापारी पोंगुरु नारायण यांनाही नोटीस बजावली आहे. सीआयडीने चंद्रबाबू नायडू यांच्यांसह पोंगुरु नारायण यांच्याविरूद्ध एससी / एसटी अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे.


First Published on: March 16, 2021 12:36 PM
Exit mobile version